रुग्णवाहीकांचे भाडेदर निश्चित

0
68

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: मा. उच्च न्यायालयाने रुग्णवाहीकांचे भाडेदर ठरविण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार अकोला जिल्ह्याकरीता सामान्य नागरिेकांच्या दृष्टीने तसेच रुग्णवाहिकांच्या मालकाच्या दृष्टीने सोईचे व हिताचे होईल त्याअनुषंगाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, अकोला यांनी रुग्णवाहिकांच्या सुधारित भाडेदर दिले आहेत.
मारुती व्हॅनचे महानगरपालीका क्षेत्राचे रुगणवाहिकांचे भाडेदर पाचशे रुपये प्रती एक फेरी(25कि.मी.पर्यंत), महानगरपालिका क्षेत्र सोडून एक हजार रुपये व जिल्हाबाहेर प्रती कि.मी. अकरा रुपये प्रमाणे. टाटा सुमो व मॅटडोरचे महानगरपालीका क्षेत्राचे रुगणवाहिकांचे भाडेदर सहाशे रुपये प्रती एक फेरी(25कि.मी.पर्यंत), महानगरपालिका क्षेत्र सोडून एक हजार चारशे रुपये व जिल्हाबाहेर प्रती कि.मी. बारा रुपये प्रमाणे. टाटा 407 व स्वराज मझदाचे महानगरपालीका क्षेत्राचे रुगणवाहिकांचे भाडेदर सातशे रुपये प्रती एक फेरी(25कि.मी.पर्यंत), महानगरपालिका क्षेत्र सोडून रु. एक हजार तिनशे व जिल्हाबाहेर प्रती कि.मी. चौदा रुपये प्रमाणे तर आय.सी.यु. अथवा वातानुकुलित वाहनात वातनुकूलीत यंत्रणा वाहनात बसविली असल्यास नमुद दरात 15 टक्के वाढीव दराने राहील.
जिल्ह्यांतील नागरिकांनी भाडेदर व्यतिरिक्त रुग्णवाहीका चालक व मालक यांनी अतिरिक्त भाडेदरची आकारणी केल्यास त्याबाबतची तक्रार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला येथे करण्यात यावी. जेणेकरुन संबंधीत रुग्णवाहीका चालक व मालकावर नियमानुसार कारवाई करणे शक्य होईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here