पोहरादेवी: महंतांसह अकरा कोरोना पॉझिटिव्ह

0
177

व-हाड दूत न्युज नेटवर्क
मानोरा जि. वाशीम: तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील श्रीदेवी सेवालाल संस्थान ट्रस्टचे महंतासह येथील अकरा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.
घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून गटविकास अधिकारी मोहन शृंगारे यांनी भेट देऊन येथील नागरिकांची कोविड २९ ची चाचणी वाढविण्याचे निर्देश दिले. गुरुवारी, 25 फेब्रुवारीरोजी 230 च्या आसपास नागरिकांची तपासणी केली आहे दोन दिवसात अहवाल अपेक्षित आहे.
मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे ता 23 फेब्रुवारी ला राज्याचे वनमंत्री ना संजय राठोड येऊन गेले. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यापूर्वी श्रीदेवी सेवालाल संस्थान ट्रस्टचे महंत व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची कोविड १९ चाचणी केली होती. 24 फेब्रुवारीला आरोग्य विभागाने अहवाल पाठविला. यात महंत,त्यांची पत्नी,मुलगी,भाऊ व भाव सून असे पाच इसम व गावातील सहा असे एकूण अकरा इसम कोविड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना गृहविलगीकरणात पाठविण्यात आले. आरोग्य, महसूल व पंचायत विभाग खडबडून जागे होत पोहरादेवी येथील 230 कोविड 19 ची चाचणी करून स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहे.

Advertisements
Previous articleरुग्णवाहीकांचे भाडेदर निश्चित
Next articleमुख्यमंत्री उद्धवजी कुणाला वाचवताय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here