ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी अकोल्यात सिनिअर सिटिजन सेल

0
70

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे सिनिअर सिटिजन सेल कार्यान्वीत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अपर पोलीस अधीक्षक मोनिका राउत यांच्या मार्गदर्शनात 25 फेब्रुवारीपासून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा सेल कार्य करणार आहे.
सीनियर सिटीजन सेल साठी 09067348211 हा स्वतंत्र डेडिकेटेड नंबरही उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत गोपनीय कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात राहणार असून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यावर भर देतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक पोलिस स्टेशननिहाय कार्यक्रम आगामी काळात घेण्यात येणार आहेत. हा उपक्रम
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here