बुलडाण्यात आजपासूनच कडक संचारबंदी

0
301

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा : जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी नुकतेच एक शुद्धीपत्रक काढून संचारबंदीची वेळ एका दिवसाने वाढविली आहे.
यापूर्वीच्या आदेशात शनिवार सायंकाळी 5 वाजेपासून सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली होती. परंतु आताच्या आदेशाने आज, शुक्रवार, 26 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी सोमवार, 1 मार्च च्या सकाळी 7 वाजेपर्यंत राहील. संचारबंदी दरम्यान केवळ मेडिकल, हॉस्पिटल 24 तास उघडे राहतील तर दूध विक्रीला मर्यादित वेळेत म्हणजे सकाळ ते दुपारी आणि संध्याकाळी 2 तास वेळ राहील. इतर सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार असल्याचे आदेशात नमूद आहे.

Advertisements
Previous articleज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी अकोल्यात सिनिअर सिटिजन सेल
Next articleसंजय राठोड काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here