ना. संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक दायित्व दिवस साजरा

0
180

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळाच्या वतीने आज केंद्रीय मंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक दायित्व दिवस साजरा करण्यात आला
याप्रसंगी भाजपा पूर्व मंडळाच्यावतीने मुख्य डाक घर व टेलिफोन विभाग येथे 2,000 मास्क व सॅनिटायझर चे वाटप अकोला पूर्व चे आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या हस्ते व महानगराध्यक्ष श्री विजय अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने महानगर महिला आघाडी अध्यक्ष सौ चंदाताई शर्मा ओबीसी आघाडी महानगराध्यक्ष श्री जयंतराव मसने ,मोहन पारधी, पूर्व मंडळ अध्यक्ष एडवोकेट देवाशीष काकड, उकंडराव सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी केंद्रीय मंत्री नामदार संजय धोत्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व डाक विभाग द्वारे या करोनाच्या काळात केलेल्या जनसेवे बद्दल डाक विभागाचे आभार मानले.
महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी पोस्टमन हे करोना काळात फ्रन्टलाइन वॉरियर म्हणून अकोले करांच्या सेवेत होते त्याबद्दल विभागाचे त्यांनी आभार मानले. अकोल्याच्या प्रथम नागरिक सौ अर्चनाताई मसने यांनी डाक विभागातील महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याबद्दल गौरवान्वित केले. हा कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवत व केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करून करण्यात आला त्याबद्दल श्री जयंतराव मसने यांनी विभागाचे विशेष प्रशंसा केली. यावेळी पूर्व मंडळ सरचिटणीस संदीप गावंडे, आकाश ठाकरे, अभिजीत कडू ,केशव हेडा,पोस्ट मास्टर मो.एजाज , असी. पोस्ट मास्टर शरद शेंडे , एस एम टिकार, मो.जुनैद, शाकिर अहमद, मयुर शर्मा, आकाश टाले ,भावेश सोळंकी, रुपेश लोहकपुरे , हिमांशू शर्मा यांची उपस्थिती लाभली.

Advertisements
Previous articleसंजय राठोड काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष
Next articleबुलडाणेकर.. सांभाळा स्वत:ला, 400 पॉझिटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here