लुट लो कोरोना है…!

0
424

रोखठोक .. 
सचिन देशपांडे, पत्रकार, अकोला
(M. 09822713601)

कोरोना संसर्ग नंतर लूट आणि आरोग्य यंत्रणा हे एकाच माळेचे मणी झाले आहेत. खाजगी हॉस्पिटलमध्ये होणारी लूट, केंद्र व राज्य सरकारची या विषयी चुप्पी, राजकीय पक्ष, समाजकारण करणाऱ्या संघटनांची चूप्पी ही या लूटीला अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहे. त्यांची ही मूकसंमती कुठेतरी त्यांचाही यात असलेला सहभाग स्पष्ट करत आहे. या लुटमारीच्या उद्योगात काही हॉस्पिटल आणि मेडिकल यांची साखळी कार्यरत आहे.
कोरोनावर “हेच औषध” असं कुठलंही औषध सध्या बाजारात उपलब्ध नाही. तसा दावा देखील कोणीही करत नाही. पण रुग्णांच्या बचावासाठी आणि इतर औषधांची एकत्रित मात्रेने रुग्ण वाचला जात आहे. पण जे औषध केवळ हजार बाराशे रुपयाला उपलब्ध होऊ शकते. त्याची MRP ही पाच हजार चारशे रुपये आहे. कोरोना महामारी च्या काळात या औषधाची किंमत नियंत्रित करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. स्थानिक पातळीवर राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने त्यावर देखरेख ठेवण्याची गरज होती. केंद्र आणि राज्य यांनी या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केलं.
त्यामुळे ज्यांना कोरोना झाला आणि त्यांना त्यातून वाचण्याची इच्छा आहे अशांना खाजगी रुग्णालयांनी चांगलीच लुटले आहे. रेमडेसिविर इंजेक्शन च्या संपूर्ण डोजसाठी सुमारे 25 हजार रुपयांची लुट होऊ शकते. त्याचबरोबर रुग्णालयातील पीपीई किट संदर्भातले चार्जेस हे तर रुग्ण लुटीचे दुसरे उदाहरण ठरले. एकच पीपीई किट घालणार आणि 20 किंवा त्या पेक्षा रुग्णांवर उपचार करणार आणि या सर्व रुग्णांकडून प्रत्येकी त्या किटचे चौपट दर वसूल करणार असा गोरखधंदा हॉस्पिटल्समध्ये सुरू आहे.
सहा इंजेक्शन डोज च्या रेमडेसिविर या औषधाची किंमत बाजार मूल्यात सात हजार 500 रुपयांची होते. हेच औषध खासगी रुग्णालय 32 हजार 400 रुपयाला रुग्णांना दिल जात आहे. पीपीई किट आणि रेमडेसिविर या दोनच गोष्टींमध्ये ही तफावत डोळे दिपवणारी आहे. ही लुट कुठे तरी थांबली पाहिजे गेल्या वर्षभरापासून या लुटीचा गोरखधंदा हॉस्पिटल्स, मेडिकल्स हे सराईतपणे संपूर्ण राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात सुरू आहे. जे इंजेक्शन जीवनदायी ठरू शकते त्याची मुळात किंमत बाराशे रुपये असताना ते MRP वर इतक्या महाग स्वरूपात का विकला जात आहे. जी कंपनी ते तयार करते त्यांच्या नफ्यापेक्षा विक्री करणारे अधिक फायदा घेत आहेत. हॉस्पिटल्स रुग्ण नातेवाईकांना त्यांच्याकडूनच औषध घेण्यासाठी का जबरदस्ती करतात ?. याचे गुपित लक्षात आले असेलच. ही जबरदस्ती कुठेतरी थांबलीच पाहिजे.

श्रीदत्त मेडिकल चे संचालक प्रकाश सावंल यांची माणुसकी 
अकोल्यातील श्रीदत्त मेडिकल चे संचालक प्रकाश सावंल यांना गेल्या काळात कोरोना झाला. ते एका हॉस्पिटल मध्ये भरती होते. त्यांनी ही लूट पाहिली आणि आता स्वतःच्या मेडिकलवर “ना नफा ना तोटा” या आधारावर विकण्याचा निर्धार केला. त्यांचा निर्धार समाजासाठी अत्यंत उपयोगी आणि प्रशंसनीय आहे.
मात्र श्रीदत्त मेडिकल चे संचालक प्रकाश सावंल यांचा हा निर्धार व्यक्त होत असताना खाजगी हॉस्पिटल्स मध्ये झालेली लुट प्रकर्षाने समोर आली आहे. आरोग्य यंत्रणेने ही लूट तात्काळ थांबवण्याची गरज आहे. तसेच ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार होतात त्यांना तेथूनच औषध घेण्याची सक्ती यापुढे करू नये, असे आदेश राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने काढण्याची गरज आहे. काही क्रिटिकल पेशंट सोडले तर सर्वसामान्य कोरोना रुग्णांची लुट थांबली पाहिजे. लोकांनी देखील जागृत होऊन पुढे येण्याची गरज आहे. कोरोना वरील सर्व औषधांचे मूल्य तत्काळ नियंत्रणात आणण्याची देखील गरज आहे. कोरोना महामारी मध्ये अशाप्रकारे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक दृष्ट्या लुटणाऱ्या व त्या लुटीकडे दूर्लक्ष करणाऱ्या सरकार, प्रशासन व इतर सर्वांचा निषेध….

Advertisements
Previous articleदेवमाणूसमधील एसीपी दिव्या सिंग आपल्या अमरावतीची!
Next articleआनंदाची बातमी: आता 9 ते 5 पर्यंत दुकाने उघडी राहणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here