आनंदाची बातमी: आता 9 ते 5 पर्यंत दुकाने उघडी राहणार

0
893

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात आठवडाभराचा लॉकडाऊन कायम आहे. मात्र आता सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने उघडी राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
उद्या सोमवार 1 मार्च रोजी सकाळी संपणारा लॉकडाऊन आता एका आठवड्यासाठी वाढविण्यात आला आहे.
सर्व आस्थापनांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र त्यानंतर संचारबंदी असणार आहे. मास्क वापरणे, हात धुणे तसेच सॅनिटाईझरचा वापर बंधनकारक राहील. दूध विक्रेत्यांना पूर्वीप्रमाणेच सूट राहील. विशेष म्हणजे मॉर्निंग वॉक आणि व्यायामाला परवानगी राहील. अंत्यसंस्काराला केवळ 20 ची तर विवाहाला 25 जणांची अनुमती राहील. हॉस्पिटल, मेडिकल 24 तास सुरू राहतील. वाहतुकीचे नियम पूर्वीप्रमाणेच राहतील. सर्व शाळा, कोचिंग क्लास, महाविद्यालय बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंटला 50 टक्के क्षमतेसह दिवसभर परवानगी राहिल. तर संध्याकाळी पार्सल सुविधा देता येणार आहे. या निर्णयाबद्दल जिल्हयातील व्यापारी संघटना, मोठे व लघू व्यापा-यांकडून जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त होत आहेत.

For latest news, Please follow on-

https://twitter.com/VarhadDoot

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here