राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका – संजय राठोड

0
119

व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: टिकटॉक स्टार पूजा चव्हाण प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजिनामा दिला खरा. पण असं असलं तरी राठोड यांचं मुख्यमंत्र्यांवर अजूनही दबावतंत्र सुरुच असल्याचं कळतंय.
कारण, राजीनामा तुमच्याकडेत ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी आपण पदावरुन दूर झाल्याचं राठोड यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.
राठोड यांनी आज सपत्निक मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, अनिल परबही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्यानंतर राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. पण हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवू नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती मिळत आहे.

Advertisements
Previous articleआनंदाची बातमी: आता 9 ते 5 पर्यंत दुकाने उघडी राहणार
Next articleठाकरेंचे राठोड प्रेम कायमच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here