ठाकरेंचे राठोड प्रेम कायमच

0
201
एखाद्याला लटकावयचं, आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये;
उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर निशाणा
व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मंत्रिदावर भाष्य केलं आहे. संजय राठोड यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे. तपास हा झाला पाहिजे. तो निष्पक्षपातीच असला पाहिजे. पण एखाद्याला लटकवायचं आणि आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तुम्ही म्हणाल तसा तपास होणार नाही. तुम्ही तपासाला दिशा देऊ शकत नाही आणि तपासही भरकटवू शकत नाही, असा हल्लाही त्यांनी विरोधकांवर चढवला.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेली त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. राठोड प्रकरणाचा तपास नीट होऊ द्या. चौकशी होऊ द्या. केवळ आदळआपट करू नका. आज तुम्ही ज्या तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवत आहात तीच यंत्रणा आताही काम करत आहे, असं सांगतानाच तुमच्याही काळात चांदा ते बांदापर्यंत ज्या घटना घडल्या. त्याच पोलिसांवर तुम्ही अविश्वास दाखवत असाल तर आश्चर्यच आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Advertisements
Previous articleराजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका – संजय राठोड
Next article250 रुपयात मिळणार कोरोनाची लस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here