250 रुपयात मिळणार कोरोनाची लस

0
216

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: लसीकरणाच्या तिस-या टप्प्यात केंद्र सरकारने वृद्धांना लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला असून देशभरातील 9 हजारापेक्षा अधिक खाजगी हॉस्पिटलला लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. यात बुलडाणा जिल्ह्यातील 15 खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे.
दुस-या टप्प्यात ही संख्या आणखी वाढू शकते. लसीची किंमत 250 रुपये निर्धारित करण्यात आलेली आहे. यात रुग्णालयाचा चार्ज सुद्धा अंतर्भूत करण्यात आलेला आहे. किंबहुना शासकीय रुग्णालयांमध्ये वृद्धांचे लसीकरण कधी सुरू होईल याबाबत कुठल्याही गाईडलाईन्स राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेल्या नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी दिली.
खाजगी रुग्णालयांची माहितीही जिल्हा प्रशासनाकडे नाही. खाजगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली असली तरी त्यांनी यासाठी किती तयारी केली आहे, हे सांगता येणे शक्य नाही. त्याची नोंदणी कशी होईल आणि एरियावाईज वर्गीकरण केले जाईल का ? याचीही माहिती समोर आली नाही. पण वृद्धांना लसीकरण सुरू झाले तर निश्चितच ही कोरोनाच्या अटकावाला बळ देणारी बाब ठरेल असेही ते म्हणाले.

For latest news, Please follow on-
https://twitter.com/VarhadDoot

 

Advertisements
Previous articleठाकरेंचे राठोड प्रेम कायमच
Next articleअकोल्यात 396 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here