अकोल्यात 396 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

0
136

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकाेला: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1775 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1379 अहवाल निगेटीव्ह तर 396 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
यापैकी 235 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर एक रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. जिल्ह्यातील कुरणखेड, चिंचखेड, मुर्तिजापूर, अकोला शहरातील डाबकी रोड येथील 12, एमआयडीसी व मोठी उमरी येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड येथील सात, कौलखेड येथील सहा, जठारपेठ, जीएमसी, सिंधी कॅम्प, माना, मलकापूर येथील प्रत्येकी पाच, आदर्श कॉलनी येथील चार, गायत्री नगर, रामदासपेठ, बार्शीटाकळी व केडीया प्लॉट येथील प्रत्येकी तीन, रामगाव, पातूर, शासकीय वसाहत, मार्डी ता.अकोट, केशव नगर,बायपास रोड, तापडीया नगर, गड्डम प्लॉट, पार्वती नगर, कृषी नगर, खडकी, जूने शहर, रवी नगर, म्हैसपूर, शंकर नगर, चैतन्य नगर, राऊतवाडी, जेतवन नगर व गिरी नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित सहकार नगर, येलवन, संत नगर, गीता नगर, तेल्हारा, न्यु भागवत प्लॉट, तेलीपुरा चौक, मालेगाव बाजार, रतनलाल प्लॉट, गजानन पार्क, गांधी रोड, भाटवाडी, विठ्ठल नगर, गुरुदेव नगर, लहान उमरी, शरद नगर, अगासे नगर, व्हिएचबी कॉलनी, अकोट फैल, शिवसेना वसाहत, बाजोरीयानगर, पोलिस क्वॉटर, बोरगाव, चांदुर, कान्हायशिवणी, दगडी पूल, पवनपुत्र अर्पाटमेन्ट, हिंगणा नाका, नगर परिषद कॉलनी, जवाहर नगर, भारती प्लॉट, कैलास टेकडी, व्यकटेश नगर, सुधीर कॉलनी, खेतान नगर, खोलेश्वर, विजय नगर, जैन चौक, वानखडे नगर, खानापूर वेस, रुस्तमाबाद, रजपुतपुरा, गोडबोले प्लॉट, सत्यदेव नगर, टॉवर चौक, बाळापूर, राजीव गाधी नगर, उमरी, तोष्णीवाल लेआऊट, दुर्गा चौक, स्वराज्य पेठ, आपातापा रोड, बिर्ला कॉलनी, न्यु तापडीयानगर, रणपिसे नगर, आळसी प्लॉट, मराठा नगर आदी रुग्णांचा समावेश आहे.

Advertisements
Previous article250 रुपयात मिळणार कोरोनाची लस
Next articleबुलडाणा-खामगाव बोथा मार्गे वाहतूक सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here