अकोल्यात वृद्ध व दुर्धर रुग्णांना कोविड लसीकरणास आरंभ

0
165

नोंदणी आवश्यक, आजपासून खासगी रुग्णालयात मिळेल लस
व-हाड दूत न्युज नेटवर्क
कोला: कोविडच्या लढाईत अग्रेसर राहिलेल्या आरोग्य क्षेत्रातील फ्रंट वॉरियर्सनंतर 60 वर्षांवरील वृद्ध व्यक्ती आणि 45 ते 59 वर्ष वयोगटातील दुर्धर आजाराच्या रुग्णांसाठी सोमवार, 1 मार्चपासून कोविड-19 लसीकरण मोहिमेला आरंभ झाला.
जिल्ह्यात जिल्हा स्त्री रुग्णालयासह एकूण 8 ठिकाणी लसीकरणाला सुरूवात झाली. अकोल्यात 161 जणांनी पहिल्या दिवशी लस घेतली.
लस मिळण्यासाठी ‘सेल्फ रजिस्ट्रेशन डॉट कोविन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. याशिवाय मोबाईल अॅपद्वारे सुद्धा नोंदणी करता येईल,  असे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत लसीकरण सुरू होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, मोहिमेचे समन्वयक डॉ. मनीष शर्मा आणि त्यांच्या सहका-यांचा सहभाग होता.
शहरातील मान्यवरांनी घेतली लस

स्थानिक सराफा व्यवसायी मदनलाल खंडेलवाल यांनी सोमवारी सपत्नीक लस घेतली तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील माजी संचालक विस्तार शिक्षण डॉ. एल.व्ही. कुलवाल व त्यांच्या पत्नी सुशीला कुलवाल यांच्यासह मान्यवरांनी आज लस घेतली. आपल्या पालकांना लस देण्यासाठी केंद्राकडे नागरिकांचा ओढा दिसत आहे. लेडी हार्डिंगमध्ये लस घेणा-यांसाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता.

Advertisements
Previous articleसक्तीच्या वीज वसूलीने एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
Next articleपूजाचे चारित्र्यहनन प्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करा; राष्ट्रीय बंजारा समाज युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांची मानोरा पोलिसात तक्रार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here