महिलेचे लैंगिक शोषण; युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

0
98
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
पातूर जि. अकोला: पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या आस्टुल येथील २७ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवुन डिसेबर १९ मध्ये जबरीने शाररिक संबध प्रस्तापीत केल्याप्रकरणी माझोड येथील सुरज श्रीकृष्ण खंडारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आस्टुल येथील एका महिलेसोबत माझोड येथील सुरज खंडारे याच्या सोबत परिचय झाला. सुरज याने  महिले सोबत लग्न करतो असे सांगुन डिसेबर १९ मध्ये जबरीने शारीरीक संबध प्रस्तापीत केले. यानंतर  काही दिवसांनी महिलेने सुरजला लग्नासाठी विचारले असता त्याने वाद घालत लग्नास नकार दिला. महिलेने पातूर पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली. या प्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी सुरज खंडारे यांच्या विरोधात कलम ३७६ , ४१७ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here