रेमडिसिवर इजेक्शन स्वस्त दरात उपलब्ध; ‍अकोला जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

0
131
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील कोविड हॉस्पीटल तसेच नॉन कोविड हॉस्पीटल येथे आरटीपीसीआर (कोविड चाचणी)केल्यानंतर रेमडिसिवर इजेक्शन दिल्या जाते. खाजगी रुग्णालयामध्ये हे इजेक्शन चार हजार पाचशे रुपये ते पाच हजार प्रति व्हायल या प्रमाणे विकल्या जाते. यामुळे रुग्णाला आर्थिक भुदंड होतो. त्यामुळे डिस्ट्रीक्ट टास्क् कमिटीच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रेमडिसिवर इजेक्शन एक हजार दोनशे रुपये यादराने स्वस्त मेडीकल स्टोअर किवा जनेरिक मेडीसीन स्टोअरमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी गरजूनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात कोरोनाचा वाढता प्रार्दुभावबाबत वाररुममध्ये आढावा घेण्यात आला. यावेळी पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीय, जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण, मनपाचे प्रभारी आयुक्त पंकज जावळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नितीन आंभोरे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, मनपा वैद्यकीया अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, डॉ. अश्वीनी खडसे, आदि उपस्थित होते.
महानगरपालिका व ग्रामीण भागात संपर्कातील व्यक्तीचे शोध घेवून हाय रिक्स असलेल्या व्यक्तीचा कोविड चाचण्या वाढविण्याचे सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिसरातील किमान शंभर व्यक्तीच्या चाचण्या करण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्ह्यात लागू करण्यात आलेले संचारबंदीचे सक्तीने पालन करुन अनावश्यक घराबाहेर जावू नये, प्रत्येक कोरोना रुग्णांनी आधार कार्ड किवा रेशन कार्ड सोबत आणणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. होम आसोलेशन सद्यास्थिती, आसोलेशनमधील रुग्णांना शिक्के मारणे तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांबाबत यावेळी आढावा घेतला. होमआयसोलेशन नियमाचे पालन न करण्याऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करावे, इत्यादी सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
सामाजिक अंतर, मास्क लावणे व साबणीने हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीय नियमाचे नागरिकाने काटेकोरपणे पालन करणे तसेच लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी न करता कोविन ॲपवर नोंदणी करुन आपले वेळ निश्चित करुनच लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here