चेक बाऊन्स झाल्यास खावी लागेल जेलची हवा

0
209

चेक देतांना सावधान…
व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: आथीक व्यवहार करतांना कुणाला चेक देत असाल तर खात्यात आधी बॅलन्स आहे की नाही चेक करून घ्या, जर चेक बाऊन्स झाला तर आता जेलची हवा खावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने यावर मोठे पाऊल उचलले आहे. आता जर कोणी दिलेला चेक बाऊन्स झाला तर तो कठोर शिक्षेस पात्र गुन्हा मानला जाणार आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट 1881 नुसार चेक बाऊन्स झाला तर या प्रकरणाला फौजदारी गुन्हा मानले जाते. अशी प्रकरणे आता लवकरात लवकर निकाली काढावीत असे देखील न्यायालयाने म्ह्टले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी न्यायालयात असलेल्या प्रलंबीत प्रकरणांची संख्या 35 लाखाहून अधिक असल्याचे सांगितले. हे खटले विचित्र परिस्थितीमध्ये असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी विशिष्ट कालावदीसाठी अतिरिक्त न्यायालये स्थापन करावीत आणि तसा कायदा करावा अशी सुचनाही न्यायालयाने केली आहे. आता चेक बाउन्स झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले तर वर्षानुवर्षे वाट न पाहता ही न्यायालये स्थापन करावीत. लवकरात लवकर अशी प्रकरणे निकाली काढावीत. जेणेकरून ज्यांनी खटले दाखल केले आहेत. त्यांना आर्थीक फटका बसणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here