आई वडिलांदेखत आगीत मुलगी होरपळली!

0
1698

अकोट शहरातील धक्कादायक घटना

सारंग कराळे |
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोट जि. अकोला: आपल्या लाडक्या लेकीचे लाड पुरवण्यासाठी बाप काहीही करतो. लहानपणापासून तिला वाढवतांना हौस मौज पुरवतो. मात्र त्याच लेकीला जळतांना पाहून वाचवण्यात असमर्थ ठरलेल्या बापाच्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची कल्पनाही न केलेली बरी.
मन सुन्न करणारी ही घटना अकोट शहरातील यात्रा चौकात शुक्रवारी संध्याकाळी घडली. गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त यात्रा चौकातील रहिवाशी अनिल पालेकर यांच्या घरी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंगणात कार्यक्रमाची तयारी सुरु होती. घरात त्यांची 11 वर्षाची मुलगी भूमिका घरात काही मुलींसोबत घरात होती. घरी कार्यक्रम असल्याने ती हौशीने साडी परिधान करून नटून इकडे तिकडे मटकत होती. तेवढ्याच काळाने तिच्यावर घाला घातला. चिमुकलीच्या साडीने अचानक पेट घेतला. आई वडिल रागावतील म्हणून तिने स्वत: विझण्यासाठी धडपड सुरु केली.
मात्र साडीने जास्त पेट घेतला. जास्त वेदना झाल्याने मुलीने आरडाआेरडा सुरु केला. त्यावेळी वडिल धावत आले. आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यत भुमिका 50 टक्के जळाली होती. तिला तातडीने जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र प्रकृती बिघडल्याने अकोला येथे उपचारार्थ हलवण्यात आले. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान भूमिकाने जगाचा निरोप घेतला. शोकाकूल वातावरण तिच्यावर अकोट येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisements
Previous articleचेक बाऊन्स झाल्यास खावी लागेल जेलची हवा
Next articleअकोल्यात दगडाने ठेचून गवंडीची हत्या, आरोपी अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here