जूनी पेन्शन योजनेसह शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवा

0
142

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विभागीय कार्यवाह जयदीप सोनखासकर यांची मागणी
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अमरावती : शुक्रवार दि. 5 मार्च 2021 रोजी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ अमरावती विभागाचे वतीने विभागीय कार्यवाह मा. श्री जयदीप सोनखासकर यांचे मार्गदर्शनात व नेतृत्वात मा. शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री व मा. शिक्षण मंत्री म. राज्य यांना राज्यातील खाजगी, स्थानीक स्वराज्य संस्था द्वारा संचालित प्राथमिक, माध्यमिक , उच्च माध्यमिक व आदिवासी आश्रम शाळा मधील सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ निवेदन देण्यात आले. त्यात DCPS/ NPS योजना रद्द करून सर्वांना जूनी पेन्शन योजना लागू करा, विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना प्रचलीत धोरणानुसार तात्काळ अनुदान मंजूर करा, वरिष्ठव निवड श्रेणी प्रशिक्षणाशिवाय सरसकट सर्वांना लागू करा , राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 10-20-30 वर्षाची आश्वासीत प्रगती योजना लागू करा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधाचा दि. 11 डिसेंबर 2020 चा शासन निर्णय रद्द करावा, सातव्या वेतन आयोगाचा प्रलंबीत पहिला व दुसरा हफ्ता देण्यात यावा, राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या 1 तारखेला अदा करावे व नियमीत वेतन विलंबाने होण्यास जवाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणेबाबत, अनुकंपा नेमणूक तात्काळ देण्यात यावी . या मागण्यांसह इतर सर्व प्रलंबित मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला होता.यावेळी कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून व मोजक्याच पदाधिका-यांच्या उपस्थितीत निवेदन देतांना विमाशी संघाचे अमरावती विभागीय कार्यवाह श्री.जयदीप सोनखासकर ,विमाशीचे श्रीअरविंद चौधरीअमरावती महानगर कार्यवाह , गजेन्द्र शेंडे सहकार्यवाह अमरावती ग्रामीण आदी उपस्थित होते.प्रभारी अधिक्षिका श्रिमती साबळे यांनी निवेदन स्विकारून शासनाकडे अग्रेषीत केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here