महिलांसाठी विशेष कोविड लसीकरण सत्र

0
198

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभागातर्फे ८ मार्च २०२१
रोजी जिल्ह्यात महिलांसाठी विशेष कोविड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शासन निकषास अनुसरून खालील प्रमाणे पात्र गटातील महिला लाभार्थ्यांनी सदर संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.बी. एस. कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. या लसीकरण सत्राअंतर्गत वय ६० वर्षावरील सर्व महिला,
वय ४५ ते ५९ वयोगटातील सहविकार (मधुमेह, उच्च रक्तदाब, इ. शासनाने ठरवून दिलेल्या २० आजारांपैकी आजार) असलेल्या महिला, आरोग्य विभागातील तसेच इतर फ्रंटलाईन कर्मचारी महिलांचा समावेश असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here