अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

0
332

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
वाशिम: महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे २१ फेब्रुवारी २०२१ रोजी रिसोड तालुक्यातील पेडगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह समुपदेशनाने रोखण्यात आला. या बालविवाहाबाबतची गोपनीय माहिती महिला व बाल विकास अधिकारी सुभाष संतराम राठोड यांना प्राप्त झाली होती.बालविवाहाबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडून यांना गोपनीय माहिती प्राप्त होताच त्यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी कु. लक्ष्मी एस. काळे, कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी एम. चौधरी, क्षेत्रीय कार्यकर्ता रामेश्वर पि९. वाळले, माहिती विश्लेषक रवी वानखडे, माहिती संकलक अजय यादव तसेच चाईल्ड लाईनचे समन्वयक महेश राऊत यांच्याशी संपर्क करून बालविवाह रोखण्याचे आदेश दिले.सदर पथकाने रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल सांगळे, गोपाल पांडे, महिला पोलीस शिपाई वृषाली ढगे, ग्रामसेवक सदाशिव रेखे, पेडगावच्या सरपंच सविता गणेश सुरतकर, गाव बाल संरक्षण समितीचे सदस्य गजानन आंभोरे यांच्या मदतीने अल्पवयीन बालिकेचे वडील व कुटुंबियांचे समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेतले. यावेळी उपस्थितांमध्ये कोरोना आजरा संबंधी काळजी घेवून कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात अशाप्रकारे बालविवाह होत असल्यास ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. राठोड यांनी केले आहे.

Advertisements
Previous articleमहिलांसाठी विशेष कोविड लसीकरण सत्र
Next articleमुलींना समानतेची वागणूक मिळावी: रंजनाताई बोरसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here