जिवंत वीज प्रवाहाच्या धक्क्याने चार बैलाचा मृत्यू

0
94

व-हाड दूत न्युज नेटवर्क
मानोरा: तालुक्यातील वरोली येथील अरुण गावंडे व दादाराव गावंडे यांनी ता ६ ला सायंकाळी अरूणावती नदीवर बैल पाणी पाजण्यासाठी नेले असता पाण्यात जिवंत वीज प्रवाह असल्याने चार बैलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
प्राप्त माहिती नुसार मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरोली येथील चार बैल पाणी पाजण्यासाठी अरूणावती नदीच्या पात्रात नेले असतांना पाण्यात जिवंत वीज प्रवाह असल्याने विजेच्या धक्क्याने ता ६ ला सायंकाळी दरम्यान अरुण उत्तमराव गावंडे यांचे तीन बैल व दादाराव श्रीराम गावंडे यांचा एक बैल जागीच मरण पावले शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here