महिला सक्षमीकरणासाठी सृष्टी संस्थेचा पुढाकार वाखाणण्याजोगा! – हभप गजानन महाराज वाघ

0
254

कर्तृत्ववान महिलांचा नारीरत्न पुरस्काराने गौरव
व- हाड दूत न्युज नेटवर्क
शेगाव : महिलाशक्ती हीच उन्नतीचा मार्ग,संस्काराची जननी असल्याचे सांगून महिला सक्षमीकरणासाठी सृष्टी संस्थेचा पुढाकार वाखाणण्याजोगा आहे असे गौरवोद्गार श्री ग म मतिमंद विद्यालयाचे अध्यक्ष ह भ प गजानन महाराज वाघ यांनी काढले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील सृष्टी सेवाभावी संस्थेने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्यां कर्तृत्ववान महिलांना नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोमवारी 8 मार्च रोजी सकाळी 11 वा माऊली टाॅवर,माऊली हाॅस्पीटलचे वर ,जगदंबा चौक शेगाव येथे मान्यवरांचे हस्ते पुरस्काराचे वितरण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा सौ प्रितीताई शेगोकार होत्या.तर
श्री ग. म. मतिमंद विद्यालयाचे अध्यक्ष ह भ प गजानन महाराज वाघ,नगरसेविका मालाताई ठवे,
यांची प्रमुख उपस्थिती होती.
# या महिलांचा झाला सन्मान……
शेगाव पं स सभापती सौ शारदाताई लांजुडकर,उपसभापती सौ शालिनीताई सोनोने,इंदिरा गांधी पतसंस्थेच्या संस्थापिका सौ माधुरीताई देशमुख, बुरूंगले शिक्षण संस्थेच्या प्राचार्य सौ मिनाक्षीताई बुरूंगले, बुलडाणा जिल्हा बचत गट फेडरेशन च्या अध्यक्षा सौ जयश्रीताई शेळके, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ वैशाली घनोकार, स्री रोग तज्ञ डाॅ सबा हुसेन,आयशा अतीक मेमन, सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या डाॅ प्राची जाधव,आरोग्य उपकेंद्रांच्या डाॅ मोनिका थोरात, गुणवंत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती सिरसाट अकोला, माविम च्या व्यवस्थापिका योगिता खोंड,सौ अंजलीताई देशपांडे.श्री गुरूदेव शिवण कला केंद्राच्या संचालिका सौ देवका उंबरकार, अ भा. मारवाडी महिला मंडळाच्या प्रांतीय अध्यक्षा अनिता शर्मा यांचा शाल ,पुष्पगुच्छ व शिल्ड देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी डाॅ प्राची जाधव,जयश्री गिते यांनी मनोगत व्यक्त केले.तर अध्यक्षीय भाषणात सृष्टी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्रितीताई शेगोकार यांनी स्रीयांनी एकजूट राहून प्रगती साधण्याचे आवाहन केले.
संचलन व आभार प्रदर्शन एस पी शेगोकार यांनी केले.

Advertisements
Previous articleजिवंत वीज प्रवाहाच्या धक्क्याने चार बैलाचा मृत्यू
Next articleअर्थसंकल्प म्हणजे तिघाडीचा किमान समान फसवणूक कार्यक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here