नांदु-यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून इंधन दरवाढीचा निषेध

0
313

मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुरा: तेलाचे भाव कमी असतांना सुद्धा अंबानी अदानीच्या केंद्र सरकारने गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांवर पेट्रोल डिझेल व इंधन दरवाढ लादली आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत आहे.यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये केंद्र सरकारच्या वतीने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व इंधन गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी नांदुरा तालुका काँग्रेस कमिटी,शहर काँग्रेस कमिटी,नांदुरा व शहर महिला काँग्रेस,युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय यांच्यावतीने नांदुरा शहरातील गणी पेट्रोल पंपासमोर काँगेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार श्री.राहुलभाऊ बोंद्रे यांच्या आदेशनुसार मलकापूर मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजूभाऊ एकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनआक्रोश निषेध करत केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
या जन आक्रोश मोर्चाच्या वेळी सर्वश्री जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निलेशभाऊ पाऊलझगडे, नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष भगवानभाऊ धांडे, ऍडवोकेट मोहतेशाम रजा, जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य तथा पातोंडा येथील युवा सरपंच पुरुषोत्तम झाल्टे, माजी पंचायत समिती सदस्य प्रसाद पाटील, राजू हाडे पाटील, ज्ञानेश्वर डांबरे, केशवराव मापारी, इक्बाल खान, किसन भगत, संजू इटखेडे, किसना इंगळे, महेंद्र देशमुख, विनलकुमार मिरगे, जयसेन सरदार, शालीग्राम तांगडे, संजय बाठे, शंकरभाऊ बोदळे, शुभम लांडे, वासुदेव वावगे, सोपान फाडके, दीपक काळे, पांडुरंग किसन तायडे, चंद्रकांत इंगळे, शत्रुघ्न काळे, ज्ञानेश्वर हरिचंद्र देठे, अक्षय वनारे, अमोल तांदळे, मिलिंद मोरे, वैभव साबे पाटील, सुनील वेरुळकर, सागर काटे पाटील, गजनान उन्हाळे, महेंद्र गजानन देशमुख, विष्णू पाटील, भास्कर वाकोडे आदी उपस्थित होते.

Advertisements
Previous articleप्रयोगशाळेतील उत्पादनांचे व्यावसायिकीकरण आव्हानात्मक : केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे
Next articleखुमगावच्या वाचनालय व अभ्यासिकेसाठी सढळ हाताने मदत करा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here