मलकापूर उपजिल्हारुग्णालयातील रक्तसाठा केंद्र बंद

0
410

खाजगी दवाखान्यात ज्यादा पैसे मोजावे लागत असल्याने सामान्यात नाराजी

सौ. मंगला जगताप

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
मलकापूरः विदर्भाच्या प्रवेशद्वारी शासनाने बऱ्याच वर्षापूर्वीत सुसज्ज अशा उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती केली. जवळपास सुविधा चोख आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून रक्तसाठा केंद्र बंद आहे.त्यामुळे खाजगी दवाखान्यात ज्यादा पैसे मोजावे लागत असल्याने जनसामान्यांत नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की,मलकापूर राष्ट्रीय महामार्ग ६ वर आहे.मध्य रेल्वे देखील येथून गेली आहे. त्यामुळे वारंवार अपघात घडत असतात. त्याचबरोबर परिसराती नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने तत्कालीन आघाडी सरकारने मलकापूरात सुसज्ज अशा उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती केली आहे. एवढच नाही तर तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या रुग्णालयाचे लोकार्पण देखील झाले.
आधी औषधी व साहित्य अशा वैद्यकीय बाबींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे भरपूर अडचणींचा सामना करावा लागला.मात्र काही काळानंतर बऱ्यापैकी परिस्थिती आटोक्यात आली.परिसरात अपघातांचे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे ९०% रुग्णांना रेफर केले जाते ही परिस्थिती आहे. रुग्णालयात महत्त्वाचा भाग म्हणजे शस्त्रक्रिया त्यात रक्त आवश्यक असते.पण येथील उपजिल्हा रुग्णालयातील रक्तसाठा केंद्रच बऱ्याच दिवसांनी बंद ते बंदच असल्याच वास्तव पुढे आले आहे. शस्त्रक्रिया मग अपघात असो प्रसुती अशा विविध बाबींसाठी शासकीय रक्त पुरवठा करण्यात प्रशासन सध्या तरी असमर्थ असल्याच दिसून येते. नव्हे तशा आशयाची ओरड जनमानसात होत आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
दरम्यान तात्काळ रक्ताची गरज भासल्यास जनसामान्यांना खाजगी दवाखान्यात धाव घ्यावी लागते. तिथे ज्यादा दराने पैसे मोजावे शेवटी रुग्णांच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याने सामान्य नागरिक हा खर्च रडतपडत करतात. पण त्यात त्यांची प्रशासनावरील तिव्र नाराजी लपून राहत नाही हे मात्र खर.! लोकप्रतिनीधींनी याकडे लक्ष देण्याची गरज प्रतिपादीत होत आहे.

“आपल्या शासकीय रुग्णालयात बऱ्याच दिवसापूर्वी रक्तदाता केंद्र सुरू करण्यात आले होते.ते काही काळ सुरळीतपणे चालले. मात्र तेथील तज्ञ डॉक्टरांनी राजीनामा दिला. ती पदे रिक्त असल्याने केंद्र बंद आहे.
-डॉ. अमोल नाफडे, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हारुग्णालय मलकापूर

Advertisements
Previous articleएमपीएससीच्या तारखेबाबत उद्या निर्णय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Next articleआता एमपीएससी ची परिक्षा 21 मार्चला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here