मलकापुरात बनावट ऊंट बिडीचा धंदा जोमात,रामचंद्र ट्रेडर्स वर धाड, 12 हजाराचा मुद्देमाल जप्त , आरोपी अमर तलरेजा अटकेत

0
457

सौ. मंगला जगताप
व-हाड दूत न्युज नेटवर्क
मलकापुर: राज्यात प्रचलित ऊंट बिडी कंपनीच्या नावाची नक्कल करून बनावट बिडीची विक्री करणाऱ्या मलकापुरातील एका व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट बिड्या विक्री केल्या जात असुन या मुळे शासनाला टॅक्स भरून हा व्यवसाय करणाऱ्या बीडी कंपनीला आर्थीक नुकसान होत आहे. मलकापूर शहरात बनावट ऊंट बिडी विकल्या जात असल्याची माहिती या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीला मिळाली होती.या बाबतची शाहनिशा केल्या नंतर ऊंट बिडीचे सर्वेअर अमोल कुलकर्णी यांनी याची तक्रार मलकापुर शहर पोलिसांत दिल्याने पोलिसांनी या तक्रारीवरून शुक्रवारी 12 मार्च रोजी मलकापुर शहरातील बुलढाणा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज काॅम्पलेक्स मधील रामचंद्र ट्रेडर्सवर धाड टाकली असता या दुकानातून ऊंट बिडी या प्रचलित कंपनीच्या नावाचा बनावट साठा किंमत 12 हजार रुपये जप्त करण्यात आला आहे . यावेळी आरोपी अमर रामचंद्र तलरेजा रा.संत कवंरराम नगर,मलकापुर याचे विरुद्ध व्यापार चिन्ह अधिनियम 1999 चे कलम 102 , 103,104 तसेच कॉपीराईट एक्ट 1957 चे कलम 63 आणि भादवीच्या कलम 420 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक म्हसाय करीत आहे.

Advertisements
Previous articleबॉस, ताई, दादा, बाबा.. हे चालणार नाही!
Next articleअकोल्यात युवतीचा संशयास्पद मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here