रेल्वे कॉलनीत हत्येचा थरार, चार तासात आरोपी जेरबंद

0
165

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला  : अकोट फैल पोलिस ठाण्याअंतर्गत  रेलवे कॉलनी परिसरात  एका इसमाची हत्या झाल्याची घटना शनिवारी दि. 13 मार्च रोजी दुपारी उघडकीस आली.
हत्या झाल्यानंतर अवघ्या चार तासाच्या आत ठाणेदार महेंद्र कदम यांच्या पथकाने आरोपी सोहम गायकवाड (वय 45) याला अटक केली आहे.
मृतकाचे नाव नरेश उर्फ बंटी मंगवाने (वय 52) रा. संत कंबीर नगर अकोट फैल अकोला असे आहे. आर्थिक देवाण घेवाणीतून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हल्लेखोरांनी चाकू, पाईपने हल्ला केल्याने मंगवाने यांना जीव गमवावा लागला. घटनेची माहिती मिळताच अकोट फाईल पोलिस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र कदम आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. याप्रकरणी पोलिसांनी युद्धस्तरावर तपास केल्याने आरोपीस जेरबंद करता आले.एकाच दिवसात दोन हत्यांच्या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here