महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: आमदार राजेश एकडे

0
231

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

मलकापूर: नाफेड अंतर्गत भक्तीराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मलकापूर यांच्या माध्यमातून दाताळा येथे मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते शासकीय हमीभाव हरभरा खरेदीचा शुभारंभ आज संपन्न झाला.शेतकऱ्यांसाठी मलकापूर तालुक्यात आमदार राजेश एकडे यांच्या प्रयत्नाने दुसरे हरभरा खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव ( रु.५,१००) ने आपला हरभरा सदर कंपनीस द्यावा असे आवाहन आमदार राजेश एकडे यांनी केले.या कार्यक्रमास मलकापुर कृषी उत्पन्न बाजार समिती चे मुख्य प्रशासक डॉ.अरविंद कोलते, मलकापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.बंडूभाऊ चौधरी,मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.राजूभाऊ पाटील,मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री.शरद मोरे, श्री.एस.पी.सांभारे, श्री. विलास खर्चे, श्री.बंडूभाऊ पाचपोर, श्री.शांतारामभाऊ क्षीरसागर, श्री.सचिनभाऊ शिंगोटे,भक्तीराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मलकापूर चे श्री.प्रवीण पाटील- क्षीरसागर,शेतकरी श्री.अमोल सोनूसे, श्री.पंकज जंगले व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here