नाफेड करीता  हरभरा खरेदीस प्रारंभ

0
84

व-हाड दूत न्युज नेटवर्क
खामगाव : नाफेड करीता किमान आधारभूत किमतीनुसार लक्ष्मीनारायण एफपीसीद्वारे हरभरा  खरेदीस सुरवात करण्यात आली. शेतकरी अरुण चिंचोळकर यांच्या शुभहस्ते वजन काट्याचे पूजन व नारळ फोडून हरभरा (चना) खरेदीस सुरवात झाली. यावेळी कास्तकार अरुण चिंचोळकर यांचा शेला टोपी देऊन लक्ष्मीनारायण फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल कोल्हे, विशाल तराळे, छोटू पाटील, आनंद ढोरे, अमित तायडे, गोविंदा तायडे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना नाफेड ला शासकीय हमीभावानुसार हरभरा विकायचा आहे  त्यांनी 7218919210 / 8600978569 किंवा लक्ष्मीनारायण फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, जनूना रोड, खामगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापक, लक्ष्मीनारायण एफपीसी द्वारे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here