वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा

0
96

समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांचे आवाहन
व-हाड दूत न्युज नेटवर्क
वाशिम
 : ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक वृद्ध दिन साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाकडून १ ऑक्टोबर २०२१ रोजी साजरा करण्यात येणाऱ्या एकात्मिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वयोवृद्धांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थाना विविध प्रवर्गातील वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी अर्जदारांनी इंग्रजीमध्ये टंकलिखित केलेले तीन प्रतीतील अर्ज २२ मार्च २०२१ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे सादर करावेत.
अर्जासोबत चारित्र्यविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा दाखला, स्वतःची अलीकडील २ छायाचित्रे, वृत्तपत्र कात्रणे, समाजकार्याची माहिती व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे. सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत अर्जाचा नमुना प्राप्त करून घेता येईल. तरी इच्छुकांनी २२ मार्चपर्यंत आपले परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाहीत, असे समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here