राजर्षी शाहू पतसंस्थेचे कार्य दिशादर्शक – काकासाहेब कोयटे

0
80

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा : राजर्षी शाहू पतसंस्थेने आपल्या पारदर्शक व सुसूत्री कारभारामुळे सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सहकारात नव्याने पदार्पण करणाऱ्या पतसंस्थांसाठी या संस्थेचे कार्य दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी काढले.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी (ता.१३) बुलडाणा येथे आले असता त्यांनी राजर्षी शाहू पतसंस्थेच्या मुख्यालयी सदिच्छा भेट दिली. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संस्थाध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी काकासाहेब कोयटे यांचा सत्कार केला. श्री. कोयटे यांनी संस्थेच्या आस्थापना विभाग, लेखा विभाग, कर्ज विभाग, वसुली विभाग, आयटी विभागासह इतर विभाग व ग्रीन ऍग्रो बाजार प्रा. लि. कंपनीच्या कार्यालयास भेट देऊन कामकाजाबाबत चर्चा केली. संस्थेची प्रशस्त इमारत, मुख्य काऊंटर, कुशल कर्मचारी, आवारातील स्वच्छता पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था व राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप- क्रेडीट सोसायटीच्या वतीने चालवणाऱ्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी काँग्रेसचे युवा नेते सुनिल सपकाळ, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन उबाळे, आस्थापना विभागप्रमुख जाकीर शहा, विभागीय व्यवस्थापक भागवत गव्हाणे, लेखापाल राजू शेळके, गणेश काकडे यांच्यासह कर्मचारी, सभासद, ग्राहक हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here