लग्नखर्चाला फाटा देत अभ्यासिकेला 10 हजाराची मदत; सचिन पूनमचे स्वागतार्ह पाऊल

0
777

मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुरा: तालुक्यातील खुमगाव येथील प्रतिष्ठित नागरिक श्री व सौ अशोक सुखदेव वावगे यांचे चिरंजीव सचिन व पान्हेरा येथील प्रतिष्ठित नागरिक श्री व सौ श्रीराम सखाराम राखोंडे यांची कन्या चि सौ का पूनम यांचा शूभविवाह 15 मार्च 2021 रोजी पान्हेरा येथे पार पडला. महापुरुषांना आदर्शस्थानी मानणाऱ्या या नवदाम्पत्याने लग्नातील खर्चाला फाटा देत खुमगावात लोकवर्गणीतून साकारणाऱ्या अभ्यासिकेला मदत देण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे.
आज गावात प्रवेश करताच आधी अभ्यासिकेला 10,000 रु ची मदत देऊन एक सामाजिक काम करूनच सचिन आणि पूनमताई गृहप्रवेश करणार आहेत. गावातील नवीन पिढी शिकावी म्हणून शेतकरी कुटुंबातील नवदाम्पत्याने बाळगलेल्या या भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्राम दक्षता समितीचे सर्व कार्यकर्ते आज संध्याकाळी या नवदाम्पत्याचे स्वागत करणार आहेत.
एक चांगला सामाजिक पायंडा घालणा-या या नवदाम्पत्याला त्यांच्या भावी सुखी आणि समृध्द आयुष्यासाठी शुभेच्छा. आपल्या मुलांमध्ये सामाजिक भावनेचे संस्कार करणाऱ्या वावगे आणि राखोंडे परिवाराचे शतशः आभार. जेवढ कौतुक कराव तेवढे कमीच आहे. या कुटुंबाने फक्त 10000 रूपये नाहीतर दहा हजार पट आदर्श निर्माण केला आहे. त्यासाठी या कुटुंबाचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे.

Advertisements
Previous articleराजर्षी शाहू पतसंस्थेचे कार्य दिशादर्शक – काकासाहेब कोयटे
Next articleऔरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शहरातील हॉटेल्स बुधवारपासून बंद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here