मुलगी रनिंगला गेली अन परत आलीच नाही!

0
119

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला : पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आगीखेड येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी रविवारी सकाळी 5.00 वाजता रनिंग करण्याकरता गेली. मात्र ती परतच आली नाही. याप्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बराच वेळ झाला तरी ती घरी आली नाही म्हणून तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईकाकडे चौकशी करण्यात आली. कुठलीही माहिती न मिळाल्याने अखेर पित्याने पातूर पोलिस स्टेशन गाठले. अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून तर नेले नाही ना अशी तक्रार पातूर पोलीसात देण्यात आली. अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here