दे.राजात सहायक अभियंता लाच घेतांना अटक

0
405

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क

बुलडाणा: जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास 1500 रुपयाची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली.
जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील सहायक अभियंता योगेश भोकन यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील सोनोशी येथील तक्रारदार कंत्राटदाराकडे मुख्यमंत्री सौर शेती पंप योजनेअंतर्गत केलेल्या कामाच्या पूर्तता अहवालावर स्वाक्षरीसाठी प्रती अहवाल रु. 500 प्रमाणे 1500 रु. ची मागणी केली होती. तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणाकडे या बाबत तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी 15 मार्च रोजी सापळा रचला. पोलिस अधीक्षक विलास गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक अरुण सावंत, पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात विलास साखरे, प्रवीण बैरागी, जगदीश पवार, चालक मधुकर रगड यांनी कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here