खाजगी शाळांमधील शुल्काबाबत सुचना पाठवा!

0
172

व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: खाजगी शाळांमधील शुल्काबाबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पालक, पालक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच सामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. या सूचना शालेय शिक्षण विभागाने गठीत केलेली समिती ग्राह्य धरणार आहे. पुढील १ महिना www.research.net/r/feeregulation या संकेतस्थळावर सूचना नोंदवता येतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.

Advertisements
Previous articleकिसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन
Next articleरुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या पाच जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू तीन जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here