कोरोनाची दुसरी लाट; शंभर बळी!

0
230

अकोला: नागरिकांचा बेफिक्रीपणा लोकांच्याच जीवावर उठत आहे. नियंत्रणात आलेल्या कोरोनाने फेब्रुवारीपासून पुन्हा मुसंडी मारली अन कोरोनाच्या दुस-या लाटेला सुरुवात झाली. कोविडच्या दुस-या लाटेत जिल्हयातील 102 रुग्णांचा बळी गेला असून यातील सर्वाधिक मृत्यू हे ज्येष्ठांचे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
तज्ज्ज्ञाच्या मते अनेक रुग्ण उशिरा उपचार घेत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामळे अकोलेकरांना आता तरी बेफिकिरी सोडा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात होता मात्र तीन महिन्यांच्या वि॰ांतीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होवू लागली. रुग्णसंख्या वाढत असतानाही अनेकांनी घरीच उपचारास सुरुवात केली. त्रास वाढायला सुरुवात झाल्यानंतर लोक कोविड चाचणीचा पर्याय निवडू लागले. उपचाराला सुरुवात होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अन रुग्णाला जीव गमवावा लागतो. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णवाढीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. शिवाय या काळात 102 लोकांना जीव गमवावा लागला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. परिस्थिती गंभीर असूनही नागरिक बेफिकिरपणे वागत असल्याचे दिसून येते.

वयोगटानुसार मृत्यू
वयोगट – मृत्यू
0 ते 20- 1
21 ते 40- 8
41 ते 61 – 23
60 वर्षावरील – 70

दाखल होताच 24 तासाच मृत्यूचे प्रमाण अधिक
वैद्यकीय सुत्रांच्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या बहुतांश कोविड रुग्णांचे मृत्यू 24 तासात होत असल्याचे वास्तव आहे. यापैकी काही रुग्णांच्या फुफ्फुसाला बाधा पोहचली आहे. तर काहींचे श्वास गुदमरून मृत्यू झाले आहेत.

Advertisements
Previous articleजिल्हा परिषद व पंचायत समिती रिक्त जागांसाठी आरक्षण जाहीर !
Next articleवाघांच्या राज्यात लांडग्यांची चलती कशी ? अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांचा राज्य शासनाला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here