अकोल्यात ३० एप्रिल पर्यंत रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0
329

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने संपूर्ण राज्‍यामध्‍ये कोविड प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून शुक्रवार दि.३० एप्रिल २०२१ पर्यंत निर्गमित केलेल्या आदेशान्वये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात शुक्रवार दि.३० एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार दि.३० एप्रिल पर्यंत रात्रीची संचारबंदी तर दिवसा जमावबंदी जारी करण्यात आली असून दि.३० पावेतो शुक्रवारी रात्री आठ ते सोमवार सकाळी सात वाजेपर्यंत मुक्त संचारास मनाई असेल. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत हे निर्बंध लागू केले आहेत.

 

जारी केलेल्या आदेशानुसार, संपूर्ण अकोला जिल्ह्याकरीता दि.५ रोजी रात्री आठ वाजेपासून ते दि.३० रोजी रात्री ११ वा. ५९ मि. वाजे पावेतो खालील प्रमाणे सुधारीत आदेश पारीत करण्यात आले आहेत.

*1. संचारबंदी व Night Curfew :-*

 

a) संपूर्ण अकोला जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

b) सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ वाजेपावेतो संपूर्ण अकोला जिल्ह्यात पाच पेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन गर्दी करण्यास मनाई राहील.

c) शुक्रवार रात्री आठ वाजेपासून ते सोमवार सकाळी सात वाजेपावेतो अत्यावश्यक कारणाव्यतिरीक्त नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास मनाई असेल.

d) या निर्बंधातून मेडीकल व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, कंपनीत जाणारे व येणारे कामगार यांना सुट राहील. तथापि संबंधितांनी ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

e) वरील प्रमाणे निर्बंधातून-हॉस्पिटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनीक्स, मेडीकल इन्श्युरन्स कार्यालये, औषध विक्रेते व कंपन्या, इतर वैद्यकीय आरोग्य सेवेशी संबंधित घटक व पशुवैद्यकिय सेवा. किराणा दुकाने, भाज्यांचे दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, फळ दुकाने.रेल्वे, टॅक्सी, ऑटो व सार्वजनिक बस सेवा.मान्सून पूर्व कामे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. माल वाहतूक. कृषी संबंधित सेवा. ई कॉमर्स.मान्यताप्राप्त मिडीया,सर्व पेट्रोल पंप , गॅस वितरण प्रणाली, वाहनांसाठी वापरण्‍यात येणा-या गॅस वितरण सुविधा. शिवभोजन, स्‍वस्‍त धान्‍य दुकान व त्‍याबाबतची वाहतुक. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घोषित करण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सेवा यांना सुट राहील.

 

*२ मैदानी उपक्रम ( Outdoor Activity) :-*

a) सर्व प्रकारचे गार्डन, सार्वजनिक मैदाने, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७. या कालावधीत बंद राहतील. शुक्रवारी सायंकाळी आठ ते सोमवारी सकाळी सात या कालावधीत सर्व बागबगीचे , सार्वजनिक मैदान बंद राहतील.

b) सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत बागबगीचे व सार्वजनिकमैदाने खुली राहतील तथापी वावरणा-या व्‍यक्‍तींनी कोविड नियमांचे सक्‍तीने पालन करणे बंधनकारक राहील.

c) स्‍थानिक प्राधिकरण यांनी संबंधीत ठिकाणी आवश्‍यक तपासणी करुन गर्दी अथवा कोविडचे अनुषंगाने निर्गमित केलेल्‍या नियमांचे उल्‍लंघन होत असल्‍याचे आढळल्‍यास तात्‍काळ सदर ठिकाण बंद करणे बाबत आवश्‍यक ती कार्यवाही करावी.

*2. शॉप, मार्केट व मॉल्स :-*

सर्व दुकाने/बाजारपेठ मधील व मॉल्स मधील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून इतर सर्व प्रकारचे दुकाने बंद राहतील.

a. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने हे सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन सुरु राहतील.

b. अत्यावश्यक सेवा देणा-या दुकान मालक व दुकानातील कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घेण्यात यावे. तसेच सदर दुकानात कर्मचारी व ग्राहक यांच्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून पारदर्शक ग्लास किंवा शिल्ड, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादी सुविधा असाव्यात.

c. अत्यावश्यक सेवा पुरविणारे दुकाने वगळून इतर बंद असलेल्या दुकान मालकांनी त्यांच्या दुकानात असलेल्या कर्मचा-यांचे भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे.

*३. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था :-*

सार्वजनिक वाहतूक खालील निर्बंधासह सुरु राहील.

ऑटो रिक्शा – वाहन चालक + 2 प्रवासी

टॅक्सी (चारचाकी वाहने)

वाहन चालक + RTO द्वारे निर्धारीत करण्यात आलेली वाहनातील 50 % प्रवासी क्षमता

बस

RTO द्वारे निर्धारीत करण्यात आलेली प्रवासी क्षमता परंतु उभे राहून प्रवास करण्यावर निर्बंध राहील.

 

a) सार्वजनिक वाहतूकीद्वारे प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

b) चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

c) प्रत्येक प्रवासी वाहतूक फेरी झाल्यानंतर वाहन निर्जंतुकीकरण करुन घेणे आवश्यक राहील.

d) सर्व सार्वजनिक वाहतुक करणारे वाहनांवरील वाहन चालक व वाहनातील कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घेण्यात यावे. तसेच दिनांक १० एप्रिल, २०२१ पासून वाहन चालक व वाहनातील कर्मचारी यांनी १५ दिवसांच्या आतील वैधता असलेले कोविड-१९ निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

e) वरील प्रमाणे सार्वजनिक वाहतुक करणारे वाहनांवरील वाहन चालक व वाहनातील कर्मचारी यांनी लसीकरण करुन न घेतल्यास व कोविड-१९ निगेटीव्ह रिपोर्ट सोबत न बाळगल्यास अशा व्यक्तींवर एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

f) सर्व संबंधित रेल्वे स्टेशन मास्तर यांनी रेल्वे स्टेशनवर कोणीही प्रवासी विनामास्क फिरणार नाही रेल्वेमधील सर्वसाधारण बोगीमध्ये कोणीही प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाही याची दक्षता घ्यावी.

g) रेल्‍वेमध्‍ये प्रवास करणाऱ्या व्‍यक्‍ती यांनी मास्‍क परिधान केले नसल्‍याचे आढळल्‍यास अशा व्यक्तींवर पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

*४ कार्यालये :-*

a) सर्व प्रकारची खाजगी कार्यालये ही खालील कार्यालये वगळता बंद राहतील.

a. को-ऑपरेटीव्ह, पीएसयु व खाजगी बँका

b. BSE/NSE

c. इलेक्ट्रीक सप्लाय संबधीत कंपनी

d. टेलीकॉम सेवा पुरवठादार

e. विमा / मेडीक्लेम कंपनी

f. औषधी निर्मिती /वितरण

b) स्‍थानिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकारी यांचेकडून आवश्‍यकता भासल्‍यास इतर कार्यालय यांना मुभा देण्‍यात येईल.

c) सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील (आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून) 50% कर्मचारी यांच्या उपस्थितीतीबाबत कार्यालय प्रमुख यांनी कोविड-19 प्रोटोकॉल नुसार निर्णय घ्यावा.

d) विज, पाणी पुरवठा , बँकींग व इतर वित्तीय सेवा देणारे कार्यालये 100% अधिकारी /कर्मचारी क्षमतेसह सुरु राहतील.

e) सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयातील बैठका हया एकाच कार्यालयात असतील तर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात.

f) सर्व शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणा-या अभ्यांगतांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी, अभ्यांगतांना शासकीय कार्यालयात प्रवेश असणार नाही. याकरीता सर्व कार्यालयांनी e-visitor प्रणालीचा वापर करावा. ज्या अभ्यांगतांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले असेल त्या संबंधित विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी अशा व्यक्तींकडेस 48 तासांपूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय प्रवेश देऊ नये. तसेच निगेटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तीस संबंधित विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी प्रवेश पास दिल्यानंतरच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा.

g) सर्व खाजगी/ शासकीय / निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड-19 लसीकरण करुन घेण्यात यावे.

*५ खाजगी वाहतूक व्यवस्था :-*

खाजगी वाहने, खाजगी बसेस यांना दि.५ पासून केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ वाजेपावेतो वाहतूक करता येईल. शुक्रवार रात्री आठ वाजेपासून ते सोमवार सकाळी सात वाजेपावेतो अत्यावश्यक कारणाव्यतिरीक्त वाहतूक करण्यास मनाई असेल.

a. खाजगी बसेस मध्ये RTO द्वारे निर्धारीत करण्यात आलेल्या आसन क्षमतेसह वाहतूक करता येईल. तथापि अशा बसेसमध्ये कोणताही प्रवासी उभा राहून प्रवास करणार नाही.

b. खाजगी बसेस मधील वाहन चालक व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच दिनांक १० एप्रिल पासून खाजगी बस मधील वाहन चालक व वाहनातील कर्मचारी यांनी १५ दिवसांच्या आतील वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

६ करमणूक व मनोरंजन सुविधेबाबत :-

a. सर्व सिनेमा हॉल्स बंद राहतील.

b. ड्रामा थिएटर्स, सभागृहे बंद राहतील.

c. मनोरंजन पार्क/आर्केड्स/व्हिडीओ गेम पार्लर बंद राहतील.

d. वॉटर पार्क बंद राहतील.

e. क्लब, स्विमींग पुल, व्यायामशाळा व स्पोर्ट कॉम्प्लेक्सेस बंद राहतील.

f. वरील आस्थापनाशी संबंधित सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे.

g. फिल्म / मालिका / जाहिरात इत्यादींचे शुटींग करतांना शक्यतो गर्दी होणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी.

h. फिल्म / मालिका / जाहिरात इत्यादीशी संबंधित सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे व दि.१० पासून सर्व संबंधित कलाकार व कर्मचारी यांनी १५ दिवसांच्या आतील वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

*७ रेस्टॉरंट, बार, हॉटेल, उपहारगृह :-*

a) सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स,उपहारगृह व बार बंद राहतील.

b) सर्व रेस्टॉरंट / हॉटेल्स/ उपहाररगृह मालकांना ( Take Away) टेक अवे, पार्सल सुविधा व होम डिलीव्हरी सुविधा या केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत देता येईल. तसेच शनिवार व रविवारी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत केवळ होम डिलीव्हरी सुविधा देता येईल.

c) हॉटेल मध्ये असलेले रेस्टॉरंट व बार हे केवळ in-house guest करीता सुरु राहतील, मात्र कोणत्याही परिस्थितीत outside guest यांना परवानगी असणार नाही.

d) होम डिलीव्हरी सुविधा पुरविणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड लसीकरण करुन न घेतलेल्या कर्मचारी यांना दि.१० पासून १५ दिवसांच्या वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

e) कोविड -19 लसीकरण करुन न घेतलेले व कोविड-19 RTPCR चाचणी निगेटीव्ह रिपोर्ट नसलेले कर्मचाऱ्यांवर एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल व संबंधित हॉटेल/ रेस्टॉरंट/ उपहारगृह यांचेवर दहा हजार रुपये मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच पुन्हा अशीच चूक केल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनांचे परवाना रद्द करण्यात येईल. अशा प्रकारे दंडात्मक कारवाई करण्याबाबत अन्न प्रशासन, पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करावी.

f) हॉटेल/ रेस्टॉरंट/ उपहारगृह या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व सबंधीतांनी लसीकरण करुन घेणे.

*८ धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे :-*

a) सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे हे बंदच राहतील.

b) या ठिकाणी सेवेत असलेले सर्व कर्मचारी आपले कर्तव्ये पार पाडू शकतील परंतू बाहेरील व्‍यक्‍तींना परवानगी राहणार नाही.

c) वरील ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे.

९ केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर :-

a) केशकर्तनालये (बारबर शॉप) / स्पा / सलून / ब्युटी पार्लर इत्यादी आस्थापना बंदच राहतील.

b) वरील ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे.

*१० वृत्तपत्रे :-*

a) सर्व वृत्तपत्रांना व छपाई व वितरण करता येईल.

b) सर्व वृत्तपत्रे हे दररोज सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत वितरीत करता येतील.

c) वरील आस्थापनाशी निगडीत सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड लसीकरण करुन न घेतलेल्या कर्मचारी यांना दि.१० पासून १५ दिवसांच्या वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

*११ शाळा व महाविद्यालये :-*

a) सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये बंद राहतील.

b) इयत्ता १० वी व १२ वी च्‍या परिक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्‍यांबाबत नियम शिथील राहतील. तथापि वरील प्रमाणे सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड लसीकरण करुन न घेतलेल्या कर्मचारी यांनी परिक्षेच्‍या पूर्वी ४८ तासांच्या आत केलेले कोविड-19 RTPCR चाचणी निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

c)राज्याबाहेरील कोणत्याही मंडळ, विद्यापीठ किंवा प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी महाराष्ट्रातील रहिवासी विद्यार्थ्यांना यांना त्रास होवू नये या करिता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संदर्भात संबंधित विभागामार्फत परवानगी दिली जाऊ शकेल.

d) सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण केन्‍द्रे बंद राहतील.

e) या बाबतीत संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे.

*१२ धार्मिक / सामाजिक / राजकीय / सांस्कृतीक कार्यक्रमांबाबत :-*

a) सर्व प्रकारचे धार्मिक / सामाजिक / राजकीय / सांस्कृतीक कार्यक्रम साजरा करण्यास बंदी असेल.

b) निवडणूकींच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.

c) नियंमांचे उल्लंघन झाल्यास, संबंधीत जागेचे मालक यांना जबाबदार धरण्‍यात येईल. त्‍यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंड आकारण्‍यात येईल. तसेच गंभीर उल्लंघन झाल्यास संबंधीत जागा ही साथीचा रोग संपेपर्यंत सिल करण्‍यात येईल.

d) कोणत्याही उमेदवाराच्या मेळाव्यात दोनपेक्षा जास्त वेळेस उल्लंघन झाल्यास, जिल्हाधिकारी यांचेकडून कोणत्याही राजकीय मेळाव्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही.

e) इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी जसे रॅली, कॉर्नर मीटिंग्ज इ. सर्व यांनी कोविड-१९ चे अनुषंगाने निर्गमित केलेल्‍या आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील.

f) लग्न समारंभ / अंत्यविधी कार्यक्रमांबाबत :-

1) लग्न समारंभ व इतर समारंभ हे केवळ ५० व्‍यक्‍तींच्‍या उपस्थितीत कोविड नियमावलींचे पालन करुन घरच्या घरी शास्त्रोक्त/वैदीक पद्धतीने अथवा नोंदणीकृत विवाह पद्धतीने साजरा करण्यात यावेत. तसेच लग्न समारंभास येणा-या प्रत्येक व्यक्तीने भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड लसीकरण करुन न घेतलेल्या व्यक्तींनी कोविड-19 RTPCR चाचणी निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील. उल्लंघन करणा-या व्यक्तीस एक हजार रुपये मात्र दंडाची आकारणी करण्यात येईल. तसेच संबंधित आस्थापनेवर दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

1) अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ २० व्‍यक्‍तींनाच उपस्थित राहता येईल.

*१३ उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणेबाबत :-*

1) उघड्यावर कोणासही खाद्यपदार्थांची व्रिकी करता येणार नाही. तथापि पार्सल किंवा होम डिलीव्हरी सुविधा दररोज सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या वेळेत देता येईल.

2) पार्सल सुविधा देतांना ग्राहकांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे आवश्यक राहील.

3) नियमांचे उल्लंघन करणा-या आस्थापना या कोविड-19 आपत्तीचे निवारण होईपावेतो बंद ठेवण्यात येतील.

4) प्रत्येक व्यक्तीने भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड लसीकरण करुन न घेतलेल्या व्यक्तींनी कोविड-19 RTPCR चाचणी निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

5) नियमांचे उल्लंघन करणा-या आस्थापनेवर अन्न प्रशासन, पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था यांचेमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

*१४ उत्पादन करणारे आस्थापना / कंपन्या / घटक :-*

1) कारखाने व उत्पादन करणारे आस्थापनेच्या प्रवेशाच्या ठिकाणी सर्व कामगारांचे थर्मल गनच्या सहाय्याने तापमान मोजणे आवश्यक राहील.

2) ज्या कारखाने / कंपनी मध्ये ५०० पेक्षा जास्त कर्मचारी काम करीत असतील अशा ठिकाणी कंपनी / कारखाने / आस्थापनांनी स्वतंत्ररित्या Quarantine सेंटर उभारावे.

3) कोणताही कामगार कोविड-19 बाधित असल्याचे आढळून आल्यास अशा कामगारास Quarantine करण्यात यावे व त्याचे वेतन कपात न करता नियमानुसार वेतन अदा करावे.

4) एखादा कर्मचारी वैद्यकीय रजेवर असल्यास किंवा बाधित झाल्यास त्यास कामावरुन कमी करण्यात येऊ नये व त्याचे वेतन कपात न करता नियमानुसार वेतन अदा करावे.

5) लंच ब्रेक व टी- ब्रेक मध्ये एकाच वेळी होणारी कामगारांची गर्दी नियंत्रित करण्यात यावी. तसेच जेवणाचे ठिकाण सामाईक असू नये.

6) सामाईक असलेले स्वच्छतागृहे वारंवार निर्जंतुकीकरण करुन घेण्यात यावे.

7) वरील ठिकाणी काम करणारे सर्व कामागर / कर्मचारी / मालक / चालक यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड लसीकरण करुन न घेतलेल्या व्यक्तींनी 15 दिवस आतील वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणी निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

*१५ Oxygen पुरवठादार :-*

Oxygen पुरवठयाबाबत सर्व ऑक्सिजन पुरवठा करणा-या कंपन्या यांनी शासनाने तसेच या कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करावी.

a)कच्चा माल म्हणून ऑक्सिजनचा निव्वळ ( खाजगी) ग्राहक असणारी कोणतीही औद्योगिक प्रक्रिया दि.१० एप्रिल पासून नाकारली जाईल. अशा प्रकारची प्रक्रिया करण्यास इच्छुक असलेल्या संस्‍थेने परवाना देणाऱ्या प्राधिकरणाकडे विशेष कारणासह परवानगी मागावी. सर्व परवानाधारक प्राधिकरण यांनी खात्री करुन घ्यावी की संबंधित आस्थापनांनी एकतर दि.१० पर्यंत प्रक्रिया थांबविली पाहिजे किंवा सुरू ठेवण्यासाठी परवानगी मिळविली पाहीजे.

b) ऑक्सिजनचे सर्व औद्योगिक उत्पादक यांनी त्यांचे 80% उत्पादन (Actual as well as Capacity) वैद्यकीय किंवा औषधी उद्देशांसाठी राखून ठेवतील. त्यांनी आपल्या ग्राहकांबाबत घोषित केले पाहिजे आणि 10 एप्रिल 2021 पासून पुरविण्‍यात येणा-या ऑक्‍सीजनच्‍या शेवटच्‍या वापराबाबत बाबत कळविले पाहीजे.

*१६ E-Commerce :-*

1) ई कॉमर्सशी संबंधित सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड लसीकरण करुन न घेतलेल्या कर्मचारी यांना दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून 15 दिवसांच्या वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

2) नियमांचे वारंवार उल्लंघन करणा-या ई कॉमर्स आस्थापनांचे परवाना रद्द करण्यात येईल.

*१७ को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी :-*

1) को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये 5 पेक्षा जास्त कोविड-19 बाधित रुग्ण आढळून आल्यास अशा ठिकाणी सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र (Micro-Containment Zone) घोषित करण्यात यावे. व त्या ठिकाणी मोठया अक्षरातील फलक लावण्यात यावा, जेणे करुन अभ्यांगतांना प्रवेश असणार नाही.

2) सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र (Micro-Containment Zone) च्या ठिकाणी प्रवेश करणे व निर्गमन करण्याच्या बाबतीत प्रतिबंध करण्याची जबाबदारी सोसायटीची राहील.

3) वरील सुचनांचे पहिल्यांदा उल्लंघन करणा-या सोसायटीस रुपये 10000/- मात्र दंडाची आकारणी करण्यात येईल. तद्नंतर परत नियमांचे उल्लंघन केल्यास जास्तीत जास्त दंडाची आकारणी करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा.

4) सर्व संबंधित हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन यांनी सोसायटीच्या ठिकाणी येणा-या प्रत्येकाची भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण पूर्ण होईपर्यंत RTPCR चाचणी करुन घेणे आवश्‍यक राहील. .

*१८ बांधकामाबाबत :-*

1) बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध आहे अशाच ठिकाणचे बांधकामे सुरु राहतील. कामगारांना ये-जा करण्यास शक्‍यतो टाळण्‍यात यावे. तथापि बांधकाम साहित्याची ने-आण करण्यास मुभा राहील.

2) बांधकामाच्या ठिकाणातील सर्व कामगार / कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड लसीकरण करुन न घेतलेल्या कर्मचारी यांना दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून 15 दिवसांच्या वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

3) वरील सुचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकास रुपये 10000/- मात्र दंडाची आकारणी करण्यात येईल व पुन्हा उल्लंघन केल्यास सदरचे बांधकाम कोविड-19 आपत्तीचे निवारण होईपावेतो बंद ठेवण्यात येतील.

4) कोणताही कामगार कोविड-19 बाधित असल्याचे आढळून आल्यास अशा कामगारास वैद्यकीय रजा देवून Quarantine करण्यात यावे व त्याला कामावरुन कमी न करता तसेच वेतन कपात न करता नियमानुसार वेतन अदा करावे.

वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग, महसूल विभाग, ग्रामीण विकास , नगर पालिका व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. असेही आदेशात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisements
Previous articleगृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे
Next articleस्वास्थ्य हीच खरी संपत्ती आणि सुखी जीवनाचा मंत्र !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here