नांदुरा तहसील कार्यालयात तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0
1418

मंगेश फरपट |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
नांदुरा: येथील तहसील कार्यालयात गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका तलाठ्याने तहसीलदारांच्या कक्षाशेजारी असलेल्या स्वच्छता गृहात गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. अनिल लक्ष्मण अंभोरे असे या तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर असे की, नांदुरा तहसील अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत असलेले अनिल लक्ष्मण अंभोरे यांचे प्रेत गुरुवारी सकाळी दिसून आले. त्यांनी
तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या केबिनमधील स्वच्छता गृहात गळफास घेतली.
नांदुरा तहसिलमध्ये कार्यरत असलेले तलाठी अनिल अंभोरे वय ४५ हे हिंगणा दादगाव येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. पंरतु त्यांचेवर कामात अनियमितता असल्याने त्यांचेवर मुख्य कार्यालयी अटॅजची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून तलाठी अनिल अंभोरे हे अस्वस्थ झाले होते. तसेच त्या दरम्यान त्यांना  मद्य सेवनाची सवयही जडल्याचे बोलले जात आहे. या रागाच्या भरात ते १५ एप्रील रोजी सकाळी ८ वाजता मद्यधुंद अवस्थेत तहसिल कार्यालयात आले व तहसिलदार राहूल तायडे यांच्या दालनातील शौचालयात जावून दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना तहसिल कार्यालयात कर्मचाऱ्यांना कळताच एकच खळबळ उडाली. आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी तहसिल कार्यालय गाठून तलाठी अनिल अंभोरे यांचा मृतदेह ताब्यात घेवून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी मृतदेह सामान्य रूग्णालय येथे पाठविला. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कार्यवाही सुरू होती. तर तलाठी अनिल अंभोरे यांनी नेमणे कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली. याचे कारण मात्र समजू शकले नाही.

Advertisements
Previous articleजाणून घ्या, अकोल्यात काय असेल चालू काय बंद! 30 एप्रिलपर्यंतचे संचारबंदी आदेश जारी
Next articleनगर परिषद व नगरपंचायत कर्मचा-यांनी उपसले लेखणी बंदचे शस्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here