व-हाड दूत न्युज नेटवर्क
खामगाव: बिअर घेवून जाणा-या युवकास पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी 7.30 वाजता बाळापूर नाक्यावर घडली.
स्थानिक बाळापूर नाक्यावरील हॉटेल अजय जवळ विशाल अनिल बशिरे हा काल १५ एप्रिल २१ रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास किंग फिशर कंपनीच्या ६५० मिलीच्या ३६ नग बियरच्या काचेच्या शिश्या ( एकुण किं .६१२० रू . ) विनापरवाना बाळगताना आढळून आला . त्याचेजवळून ६१२० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याप्रकरणी अप्पर पोलिस अधीक्षक पथकातील गजानन निकम ( रायटर ) यांनी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपीविरुद्ध कलम ६५ ई मदका अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ . गजानन जोशी करीत आहेत .
Advertisements