माजी आ. विजयराज शिंदे यांना शिवसैनिकांची मारहाण, बुलडाण्यात भाजप-शिवसेनेत राडा

0
967

व-हाड दूत न्युज नेटवर्क 
बुलडाणा: शिवसेना आमदार संजय गायकवाड़ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोना विषाणु कोंबायचे विधान केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपाचे काही पदाधिकारी गायकवाड़ यांचा जयस्तंभ चौकात पुतळा जाण्यासाठी एकत्र झाले. तेव्हा भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली. दरम्यान शिवसैनिकांनी माजी आमदार विजयराज शिंदेसह भाजपाच्या काही पदाधिका-यांना मारहाण केली.
आमदार संजय गायकवाड़ यांचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या भाजपा नेते आणि पदधिकार्यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. शिवसेना नेते विजयराज शिंदे यांच्या सहित तीन ते चार भाजपा कार्यकर्त्यांवर शिवसैनिकानी हल्ला चढविला. ही घटना बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात दुपारी 4 वाजेदरम्यान घडली. शिवसैनिकांचा आरोप आहे की, भाजपावाले आमदार गायकवाड़ यांचा पुतळा जाळण्यासाठी आले होते. तेव्हा धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष तथा आमदारपुत्र कुणाल गायकवाड़ यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात पकडापकडी झाली. शिंदे यांना खाली पाडुन मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या मध्यस्थिने दोन्ही गटाना वेगळे करण्यात आले.

भाजप नेते योगेंद्र गोड़े तथा विजयाताई राठी, प्रभाकर बारे, सोनू बाहेकर, करण बेंडवाल तसेच अनेक भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. इकडे शिवसैनिकांमध्ये श्रीकांत गायकवाड़, बाळासाहेब धुड, बंडू आसाबे, संदीप पुराणिक तसेच अनेक जण सहभागी होते. शिवसैनिकांच्या आक्रमकतेपुढे भाजपाला पळती भुई थोड़ी झाली, असा दावा शिवसेनेने केला आहे तर शिवसेनेची दादागिरी या घटनेतून समोर आली आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. सध्या भाजप नेते आणि कार्यकर्ते शहर पोलिस स्टेशनला गोळा झालेले आहेत.
खामगावात आमदार संजय गायकवाड यांचा पुतळा जाळला
दरम्यान खामगाव येथे भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा पुतळा जाळला. तर आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरुद्ध बेताल वक्तव्य करणा-या आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कारवाई करावी तसेच बुलडाण्याचे भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांना मारहाण करणा-या आमदारपुत्र कुणाल गायकवाड़ यांच्यासह शिवसैनिकांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

Advertisements
Previous articleउपरवाले से डरो ..
Next articleवाशीम: सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंतच दुकाने सुरू राहणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here