पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रात ऑक्सिजन प्लांट उभारणार

0
67

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रात ऑक्सिजन प्लांट उभारणार
जिल्हाधिका-यांनी केली पाहणी, रुग्णांना मिळणार दिलासा
अकोला: जिल्ह्यातील महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र येथील ओझोन वायु प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती करुन त्याची अकोला जिल्ह्यात सध्याच्या आपत्तीच्या काळात उपलब्धता करता येते का? याबाबतच्या शक्यतेसंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रास भेट दिली.
यावेळी त्यांचे समवेत महानिर्मिती पारस औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता खराटे व उप मुख्य अभियंता दामोदर तसेच बाळापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी उपस्थित होते.
औष्णिक विद्युत निर्मिती करतांना आवश्यक असणा-या ओझोन वायुच्या उपलब्धतेसाठी येथे ऑक्सइजन निर्मिती केली जाते. त्यासाठी पारस येथे दोन संयंत्रे आहेत. या ठिकाणी निर्माण होणारा ऑक्सिजन हा ओझोन प्रक्रियेसाठी वापरला जात असल्याने निर्माण होणारा ऑक्सिजन हा सिलिंडरमध्ये भरण्याची व्यवस्था येथे नाही. त्यासाठी आवश्यक कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामुग्री येथे उभारल्यास येथून ५०० सिलिंडर इतका ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी पापळकर यांनी व्यक्त केला. याठिकाणी सिलिंडर्स भरता यावे यासाठी संयंत्रे उभारण्याबाबत पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे, महाजेनको व शासनस्तरावर पाठपुरावा करुन प्रयत्न सुरु आहेत. पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या अधिका-यांनी प्राधान्य देऊन पाठपुरावा करावा,असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. त्यासाठी जिल्हाप्रशासनही प्रयत्न करीत आहे,असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी स्पष्ट केले.
ऑक्सिजनची कमतरता
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात अनेक रुग्णांना ऑक्सीजनची गरज भासत आहे. सद्यस्थितीत जिल्हा स्त्री रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट कार्यान्वीत आहे. याठिकाणाहून आवश्यकतेनुसार ऑक्सीजन पुरवल्या जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here