दारूच्या बाटल्या रिकाम्या करण्यापेक्षा रक्ताच्या बाटल्या भरूया!

0
292

म. जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मंगेश फरपट |
व-हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुरा:
महात्मा फुले जयंती व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खुमगाव येथे 20 एप्रिलरोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवकांनी रक्तदान करून महामानवांना अभिवादन केले.
सध्या कोरोना काळात महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय.  त्यामुळे महापुरुषांची जयंती ही नाचून नव्हे तर वाचून साजरी झाली पाहिजे. याच विचाराने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त
नांदुरा तालुक्यातील खुमगाव येथील युवकांनी शाहू- फुले-शाहू-आंबेडकर यांना मानणाऱ्या तरुणांकडून 20 एप्रिलरोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी
रक्तदान करणा-या युवकांना कार्डचे वाटप करण्यात आले. गावातील तसेच गाव परिसरातील गरजू व्यक्तीला भविष्यात रक्ताची गरज लागली तर या कार्डवर रक्त उपलब्ध होईल असेही सांगण्यात आले.
यावेळी सरपंच रोहित सोनोने, उपसरपंच सौ छाया महेंद्र गोळे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू भाऊ वावगे,गजानन सातव,अमोल टीकार, ग्रामसेवक राजेंद्र कोलते,समाज सेवक मनोजभाऊ वानखडे, महेंद्र गोळे व इतर तरुण मंडळाचे कार्यकर्ते हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here