संचारबंदीचे उल्लंघन करणा-यांना अकोला पाेलिसांचा दणका

0
272

व-हाड दूत न्युज नेटवर्क 
अकोला: संचारबंदीचे उल्लंघन करणा-या नागरिकांना अकोला पोलिसांकडून चांगलाच हिसका दाखवला जात आहे. आज दिवसभरात सकाळपासून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान दुपारी 4 वाजेपर्यंत १ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. तब्बल 60 वाहने जप्त करण्यात आले असून १५० लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. स्वत: जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी शहरातील विविध चौकात पाहणी केली. अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत यांच्यासह वाहतूक पोलिस नियंत्रण शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी ही कारवाई केली. कोणतीही सुरक्षा न पाळता बाहेर पडणा-या नागरिकांवर अकोल्यात आता कड़क कारवाई केली जात आहे.
या नागरिकांविरुद्ध पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात येत आहे.. अनेक ठिकाणी थेट वाहनेच जप्त करण्यात आली आहेत. तर ही जप्त केलेली वाहने आता संचारबंदी संपुष्टात आल्यानंतरच संबंधितांना परत देण्यात येणार आहेत.

Advertisements
Previous articleकोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शासनाकडे नियोजनाचा अभाव: अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात
Next articleआजोबा, माझ्या खाऊचे पैसे कोरोना मदत पेटीत टाका, चिमुकल्याची आर्त हाक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here