रेमडीसीविरचे 3 इंजेक्शन 75 हजाराला! अकोल्यात टोळी गजाआड

0
210

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला : कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची अकोल्यात अवैधरित्या 25 हजारात विक्री सुरु होती. या प्रकाराचा भंडाफोड स्थानिक गुन्हे शाखेने केला असून याप्रकरणी पाच जणांची टोळी गजाआड केली आहे.
शुक्रवारी रात्री उशीरा केलेल्या कारवाईत तीन रेमडेसिवीर इंजेक्शन एलसीबीने जप्त केले आहेत. गरजू रुग्णांना हेरून शहरात रेमडेसीवीर इंजेक्शन प्रत्येकी 25 हजार रुपयांना विकण्यात येत होते. पोलिसांनी जप्त केलेल्या तीन इंजेक्शनची किंमत 75 हजार रुपयांच्या आसपास आहे. अकोल्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रेमडेसीवीरची मागणी वाढली आहे.
1100 रुपये किमतीचे रेमडेसीवीर इंजेक्शन 25 हजार रुपयांना विकले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून रतनलाल प्लॉट येथील जय श्रीराम मेडिकल मध्ये काम करणारा आशिष मते याच्याकडे बनावट ग्राहकाला पाठविले. मते हा विना कागदपत्रे व बिल न देताच डॉक्टरच्या प्रिस्क्रिपशनशिवाय 25 हजार रुपयात इंजेक्शन देत होता. एलसीबीने केलेल्या कारवाईत आशिष मते (वय 24) रा.भीमनगर अकोला तसेच एस.पी.सेल्स येथे काम करणारा राहुल बंड अलगद अडकले. त्यांच्याजवळून 12 हजार रुपये छापील किंमत असलेले तीन इंजेक्शन तसेच डमी ग्राहकाने दिलेले 75 हजार रुपये तसेच दोन मोटरसायकल असा एक लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांचे इतर साथीदार एका खासगी रुग्णालयाचा कर्मचारी सचिन दामोदर (वय 33) रा. अकोट फैल, सार्थक मेडिकलमध्ये काम करणारा प्रतिक शहा (वय 29) रा. रामनगर अकोला, अजय आगरकर (वय 25) रा. बाळापूर नाका जुने शहर अकोला यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एस.पी. जी.श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, एलसीबी निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, राजपाल सिंह, गणेश पांडे, अब्दुल माजिद, संदिप तवाडे, रफी, इजाज अहमद, गोपाल पाटील, रोशन पटले, नफीस शेख, सुशील खंडारे, सतीश गुप्ता यांनी केली.
———————————————————————-

Advertisements
Previous articleआजोबा, माझ्या खाऊचे पैसे कोरोना मदत पेटीत टाका, चिमुकल्याची आर्त हाक
Next articleरेमडिसिवीरचा काळाबाजार करणा-यांवर गुन्हे दाखल करा; डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here