रेमडिसिवीरचा काळाबाजार करणा-यांवर गुन्हे दाखल करा; डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

0
198

जिल्ह्यातील पाचही ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू करा
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा  :जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील फायर ऑडिटला प्राधान्य द्या असे सांगून सध्या सुरू असलेल्या रेमडिसीविर इंजेक्शनच्या काळ्या बाजारावर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधितावर गुन्हे दाखल करा तसेच जिल्ह्यातील पाचही ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्वरित सुरू करा, असे  आदेश दिले.
कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत डॉ. शिंगणे यांच्या उपस्थितीत  बैठक घेण्यात आली. तेव्हा ते बोलत होते. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, उपजिल्हाधिकारी अहिरे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. खामगाव, सिंदखेडराजा, मेहकर, मलकापूर व जळगाव जामोद येथे मान्यता देण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती युद्धपातळीवर करण्यात यावी. तसेच खासगी व शासकीय रुग्णालयाला लागणा-या ऑक्सिजन साठ्यासंदर्भात वेळेवर मागणी न करता प्रत्येक तहसील स्तरावर सक्षम अधिका-याची नियुक्ती करून त्यांच्याकडून मागणी नोंदवावी, असे आदेशही डॉ. शिंगणे यांनी दिले.
जिल्ह्यात रेमडिसिवीरचा काळाबाजार काही लोक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून खासगी रुग्णालयात रुग्णांना रेमडिसिवीर इंजेक्शन दिल्यावर रिकाम्या बॉटलवर  त्या रुग्णांचे नाव टाकण्याच्या सूचना देण्यात याव्या व त्याचे ऑडिट करावे. जे रुग्णालय याचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करावी. पोलिसांनी देखील रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, असे निर्देश दिले.
यावेळी त्यांनी लसीकरण, स्वॅब तपासणी व लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा देखील आढावा घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरण गरजेचे आहे. त्यामुळे लोकांनी लस घ्यावी. तसेच पोलिस विभागाने कडक अंमलबजावणी करावी. जिल्ह्याच्या सीमेवर बंदोबस्त ठेवावा. विनाकारण जिल्ह्याबाहेर येणा-या जाणा-यांवर कारवाई करावी,असे आदेशही डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
            गैरकृत्य करणा-यांची गय करू नका
सध्याची गंभीर परिस्थिती असूनही काही लोक चुकीच्या पद्धतीने फायदा करुन घेण्यासाठी फपापलेले दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, गैरकृत्य करणा-यांची मुळीच गय करू नका, असेही डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले. गैरप्रकार त्वरित थांबवा याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

Advertisements
Previous articleरेमडीसीविरचे 3 इंजेक्शन 75 हजाराला! अकोल्यात टोळी गजाआड
Next articleपरमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे माझ्याकडे पुरावे! अकोल्याच्या पोलिस निरिक्षकाने केली १४ पानांची तक्रार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here