बारोमास नाटकाला झी नाट्य गौरवचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार

0
260
बुलडाणा:  जिल्ह्यातील जानेफळ येथील ज्येष्ठ साहित्यिक बारोमासकार प्रा. सदानंद देशमुख यांच्या कादंबरीवर आधारित बारोमास नाटकाला झी नाट्य गौरवचा 2020 चा सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
          हा पुरस्कार मुंबई येथे रविवारी प्रदान करण्यात आला. यावेळी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार बारोमास नाटकाचे प्रयोग सादर करणाऱ्या संतोष वेरुळकर आणि नायक योगेश खांडेकर यांनी स्वीकारला. तर सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून या नाटकाच्या टीमला सन्मानचिन्हासह 1 लाख रुपयाचा रोख पुरस्कार प्राप्त झाला आहे. बारोमास कादंबरी शेतकऱ्यांची जीवनगाथा मांडणारी कादंबरी असून यावर चित्रपट व नाटक तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इंग्रजी व हिंदी भाषेमध्येही कादंबरीचा अनुवाद झाला आहे. या पुरस्काराने बुलडाणा जिल्ह्याच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे.
Advertisements
Previous articleअकोला जिल्ह्यात दारुड्या मुलाकडून बापाची हत्या
Next article‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here