कारंजा येथून 64 ऑक्सीजन सिलिंडर जप्त

0
186

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

वाशीम : कोव्हीड 19 चा संसर्ग वाढल्याने संपुर्ण देशात ऑक्सीजन अभावी अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशा परिस्थितीत कारंजा-नागपुर रोडवरील यशोतीरथ कॉलनीमधील हिंदुस्थान स्केप या ठिकाणी  बोलेरो पिकअप या गाडीतून एका ट्रकमध्ये ऑक्सीजन सिलिंडर भरण्यात येत होते. स्थानिक गुन्हे शाखेने या ठिकाणाहून 64 ऑक्सिजन सिलिंडर जप्त केले.
एलसीबीने पाहणी केली असता पिक अप क्रमांक एम एच 29 एटी 0818 या वाहनातून ट्रक क्रमांक एमएच 21 – 6001 मध्ये काही इसम ऑक्सीजन सिलिंडर भरताना आढळून आले. पिकअप वाहनात 29 तर ट्रकमध्ये 26 व न्यु हिंदुस्थान एजेंसी दुकानात 9 रिकामे सिलिंडर आढळून आले. दुकान मालक रियाज अहमद गुलाम रसुल (वय 40) वर्षे रा. झोया नगर यांची विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. सिलेंडर नागपूर येथुन खरेदी केल्याचे सांगितले. कागदपत्रांची तपासणी केली असता सिलिंडर जवाहर हॉस्पीटल कारंजा यांचे नावे खरेदी केल्याचे दिसून आले. परंतु त्याबाबत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या ठिकाणावरुन 55 भरलेले व 9 रिकामे ऑक्सीजन सिलिंडर, बोलेरो पिक अप क्रमांक एमएच 29 एटी 0818 व ट्रक क्रमांक एमएच 21 – 6001 असा एकुण 16,97,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक  वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक  विजय कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक शिवाजी ठाकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अतुल मोहनकर, अजयकुमार वाढवे, पोलीस नाईक किशोर चिंचोळकर,मुकेश भगत, अमोल इंगोले, पोलीस शिपाई राम नागुलकर, प्रविण राऊत,चालक राठोड यांनी केली.

Advertisements
Previous articleव्हाट्स अप आणणार ‘हे’ नवे फिचर;
Next article18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here