कोरोनामुळे घाबरू नका, वैद्यकीय सल्ला घ्या : डॉ.रवींद्र चौधरी

0
159

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला: शहर आणि जिल्ह्यात कोविडबाधितांची संख्या वाढत आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. तरीही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आल्यास रुग्णांमध्ये चलबिचल होते. परंतु घाबरून जाऊ नये, वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे  स्थानीय हृदयरोग तज्ञ डॉ.रवींद्र चौधरी म्हणाले.
कोरोनाची लक्षणे दिसल्यास तुरंत टेस्ट करा तसेच रिपोर्ट पॉझिटिव आल्यास विचलीत होऊ नका. डॉक्टरांवर विश्वास आणि जीवना प्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास कोरोना पासून मुक्त होता येते. तुमचा अटिट्यूड पॉझिटिव राहिल्यास खूप लवकर मात करता येते.
खूप विचार करू नका
डॉ.चौधरी म्हणाले, जीवनाप्रती सकारात्मक राहिल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती सकारात्मक राहू शकते. शरीर उपचाराला चांगली साथ देते. कोरोनाच नाही तर अन्य आजारातही ही भूमिका सकारात्मक काम करते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन,   मास्कचा नियमित वापर, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घेतल्यास ठणठणीत होणे फार अवघड नाही.
रक्तदाब, मधूमेह नियंत्रित ठेवा
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, उच्च रक्तदाब आणि मधुमेहींमध्ये इम्युनिटी कमी राहत असल्याने त्यांना कोरोना संसर्गच नाही तर अन्य आजार बळावण्याची भीती असते. त्यामुळे अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधे घ्यावी, नियमित व्यायाम करावा.
पौष्टिक आहार, ज्यूस घ्या
डॉ. चौधरी म्हणाले, चांगली इम्युनिटी राहण्यासाठी आंवळा, संत्री, लिंबूचे सेवन करावे. पौष्टिक आहार घ्यावा. विटामिन सी टॅबलेट, झिंक टॅबलेट फिजीशियनच्या सल्ल्याने घेऊ शकता. तसेच हळदीचे दूध देखील उत्तम आहे.
नंबर आल्यावर व्हॅक्सीन घ्या
डॉ. चौधरी म्हणाले, कोरोना संसर्गापासून बचावासाठी आपला  नंबर आल्यावर व्हॅक्सीन घ्या. यामुळे कोरोना संसर्गाशी मुकाबला केला जाऊ शकतो. व्हॅक्सीन घेतल्यावर काही जणांना थोडा ताप येऊ शकतो. फिजीशियनच्या सल्ल्याने गोळी घेतल्यास ताप उतरतो. परंतु व्हॅक्सीन जरूर घ्या, असेही त्यांनी सांगितले.

Advertisements
Previous articleऑक्सिजन एक्सप्रेसमुळे रुग्णांना दिलासा जिल्हयासाठी १० मेट्रिक टन साठा उपलब्ध, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे
Next articleखामगावात साकारणार जिल्ह्यातील पहिला खाजगी ऑक्सिजन प्लांट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here