धक्कादायक: स्वाभिमानीचे रविकांत तुपकरांनी स्वत:ला गाडले शेतात!

0
548

बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी स्वत:ला शेतात गाडून घेतले आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याच्या मागणीसाठी त्यांनी आज २३ सप्टेंबररोजी दुपारी हे अनोखे आंदोलन केले. सध्या पलढग ता. मोताळा येथे हे अनोखे आंदोलन सुरु आहे.
Video –
जाणून घ्या, काय म्हणाले, रविकांत तुपकर…
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या अतिपावसाने १० हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, मका, ज्वारी व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी ही पावसाने खरीप व रब्बी हंगाम पूर्णत: हातून गेला होता. यावषीर्ही अतिपावसाने शेतकरी उध्वस्त झाला आहे. सरकारकडून शेतकºयांना एक रुपयांचीही मदत मिळाली नाही. पंचनामे झाले नाही. शेतकºयांवर आत्महत्येची वेळ आली. शेतकºयांना सरकारकडून हेक्टर २५ हजार रुपये मदत मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील परडा शिवारात नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतात आंदोलनाला सुरुवात केली आहे. ते स्वत:ला गाडून घेऊन आंदोलन सुरु केले आहे.

Advertisements
Previous article‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
Next articleआत्मघात हा निश्चितच पर्याय नाही!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here