जिल्ह्यातील रुग्णालयांना 683 रेमडेसिवीरचे वितरण

0
80

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत 16 मे रोजी 683 रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली.
रुग्णालयांना बेड व रूग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर याप्रमाणे – बुलडाणा : लद्धड हॉस्पिटल 11 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पिटल 19, निकम हॉस्पिटल 3, जाधव पल्स हॉस्पिटल 11, सहयोग हॉस्पिटल 4, आशीर्वाद हॉस्पिटल 28, सिद्धीविनायक हॉस्पिटल 28, शिवसाई हॉस्पिटल 10, संचेती हॉस्पिटल 3, सोळंकी हॉस्पिटल 6,  सुश्रुत हॉस्पिटल 12, बुलडाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 14, रेड्डी हॉस्पिटल 4, न्यू लाईफ कोविड हॉस्पिटल 8,  चिखली : योगीराज हॉस्पिटल 24, हेडगेवार हॉस्पीटल 9, गुरूकृपा हॉस्पिटल 13, तायडे हॉस्पिटल 28, दळवी हॉस्पिटल 23, पानगोळे हॉस्पिटल 23, खंडागळे हॉस्पिटल 17, गंगाई हॉस्पीटल 10, जैस्वाल हॉस्पिटल 11, ओम गजानन हॉस्पिटल 9,  सावजी हॉस्पिटल 26, अनुराधा मेमोरियल 11,  मलकापूर : झंवर हॉस्पीटल 12, ऑक्सिजन कोविड केअर सेंटर 5, मुरलीधर खर्चे हॉस्पिटल 18, आशीर्वाद हॉस्पिटल 11, सिटी केअर 9, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 24, शेगांव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 13, शामसखा हॉस्पीटल 32,  खामगाव : आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 35, चव्हाण 25, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 19, मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 17, मापारी हॉस्पीटल 2, गोविंद क्रिटीकल 11, श्री. गजानन हॉस्पीटल 19, अजंता हॉस्पीटल 18, दे. राजा : संत गाडगेबाबा हॉस्पीटल 8, मी अँड आई हॉस्पीटल 10, तिरुपती कोविड सेंटर 1,   सिं. राजा : जिजाऊ हॉस्पीटल 16, आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बिबी ता. लोणार 8,  विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 14 असे एकूण 683 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र पुरवठा झालेल्या इंजेक्शन ची संख्या बघता राखीव कोट्यातील इंजेक्शन चा पुरवठा सुध्दा रुग्णालयांना करण्यात येत आहे.  सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी सदर औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रूग्णांकरीताच प्राधान्याने वापरण्यात यावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here