महाबीज सोयाबीन बियाणे वितरणात अनियमिततता; शेतकरी जागर मंचचा आरोप

0
250

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: महाबीजच्या सोयाबीन जेएस 335 बियाणे वाटपात आतापासूनच अनियमितता दिसून येत आहे. त्याची झळ या भागातील शेतक-यांना बसणार असल्याचा आरोप शेतकरी जागर मंचच्या वतीने आयोजित पत्रपरिषदेत करण्यात आला.  महाडीबीपीच्या नावाखाली कोणत्याही गावात कार्यक्रमाची  माहिती न देता पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यातून ड्रॉ पध्दतीने वाटप करण्यात येणार आहे. म्हणजे शंभर अर्जदारातून दहा शेतक-यांना लाभ मिळेल.
राज्याच्या कृषीमंत्र्यांनी या वर्षी बियाण्यांचे भाव मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढवू नये अशी ताकीद दिली होती. त्यामुळे महाबीजच्या सोयाबीन जेएस 335 बियाण्यांच्या बॅगची किंमत 2250 रूपये ठेवण्यात आली. तर, इतर कंपन्यांच्या बियाण्यांचा भाव प्रति बॅग 2800 ते 3300 रू. पर्यंत आहे. त्यामुळे महाबीज बॅगची साठवणूक करण्यात येत आहे,असे  मनोज तायडे व दीपक गावंडे यांनी सोयाबीन बियाण्यांची मागणी केली तेव्हा लक्षात आल्याचे सांगितले. बियाणे वितरणाबाबत गोंधळ होऊ न देता शेतक-यांना खरीपासाठी बियाणे उपलब्ध होईल यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी शेतकरी जागर मंचचे संयोजक कृष्णा अंधारे, जगदीश मुरूमकार, मनोज तायडे, ज्ञानेश्वर गावंडे, दीपक गावंडे यांनी केली.

Advertisements
Previous articleबालक पालक नातं… चर्चासत्राचे आयाेजन
Next articleअकोल्यात उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here