अकोल्यात उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय

0
764

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: रामदासपेठ पोलिसांनी महिला व मुलींना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणा-या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.
पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांना मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद कॉलनीतील ओंकार अपार्टमेंटमध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी छापा मारला. तेव्हा ऋषीकेश मालोकार अंबिकापूर आणि अनंत गावंडे दापुरा हे दोघे महिलेसोबत आढळले. पोलिसांनी तेथून 67,020 रु. चा मुद्देमाल जप्त केला. अमरावती जिल्ह्यातील रुस्तमपूर येथील विकी कवळे व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रामदासपेठचे उपनिरीक्षक महाजन यांच्या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे कारवाई केली. उच्चभ्रू वस्तीमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाबाबत पोलिसांची ब-याच दिवसांपासून नजर होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here